जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांच्या 'या' गोष्टीची आहे चीड,वाचून व्हाल हैरान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 11:47 IST2021-10-30T11:38:46+5:302021-10-30T11:47:12+5:30

1973 अमिताभ बच्चन  जया बच्चनसोबत लग्नबंधनात अडकले होते. लग्नाला ४८ वर्ष पूर्ण झालेत.

Interesting Fact About Amitabh Bachchan's This Habit Which Jaya Bachchan Doesn't Like Even After 48 years Of Marriage | जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांच्या 'या' गोष्टीची आहे चीड,वाचून व्हाल हैरान

जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांच्या 'या' गोष्टीची आहे चीड,वाचून व्हाल हैरान

अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सीझन 13 खूप लोकप्रिय बनला आहे. गेल्या २१ वर्षापासून सुरु असलेल्या या शोची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. कधी या शोचा नवीन सिझन रसिकांच्या भेटीला येतो. याचीच रसिक आतुरतेने वाट पाहायत असतात. या शोमुळे अनेकांना अमिताभ बच्चन यांच्याही गप्पा गोष्टी करत अनेक गोष्ट जाणून घेता येतात. अमिताभ बच्चनदेखील शोदरम्यान अनेकदा त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित अनेक जुन्या गोष्टी शेअर करतात.

आदित्य बोस नावाच्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांच्या आवडी-निवडीविषयी प्रश्न विचारला तेव्हा. पत्नी जया बच्चन यांच्याबाबत एक गोष्ट त्यांनी सांगितली. जी ऐकून सगळेच हैराण झाले. 1973 अमिताभ बच्चन  जया बच्चनसोबत लग्नबंधनात अडकले होते. लग्नाला ४८ वर्ष पूर्ण झालेत. आजही जर मी लग्नाची तारिख विसरलो तर माझी काही खैर नसते. यावरुन मग जया बच्चन यांचा मला आजही ओरडा खावा लागतो. बिग बींनी सांगितले की त्यांच्या पत्नीला महागडे गिफ्ट्स अजिबात आवडत नाहीत.छोट्या छोट्या गोष्टीतच जया बच्चन नेहमीच आनंद शोधतात. साधे आयुष्य जगणेच जया यांना आवडते. JB या नावाने जया यांचा नंबर सेव्ह केला असल्याचे त्यांनी सांगितले.

जया आणि अमिताभ बच्चन यांची ओळख हृषिकेश मुखर्जी यांच्यामुळेच त्यांच्या 'गुड्डी' सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया 'जंजीर' सिनेमात एकत्र कामही केले होते. या सिनेमानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले होते. 

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचे अनेक सिनेमा आता  प्रदर्शित होणार असून काही सिनेमांचे शूटिंग रखडले आहे. अमिताभ लवकरच 'मेडे', 'ब्रह्मास्त्र', 'झुंड' या सिनेमांमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर जया बच्चन लवकरच डिजिटल डेब्यू करणार असून एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

 

Web Title: Interesting Fact About Amitabh Bachchan's This Habit Which Jaya Bachchan Doesn't Like Even After 48 years Of Marriage