इमरान हाश्मीची हिरोईन रस्त्यांवर काढतेय रात्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 19:16 IST2016-06-09T13:46:09+5:302016-06-09T19:16:09+5:30
इमरान हाश्मी याच्यासोबत ‘आईना’ चित्रपटात (‘आईना’ हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही.) काम करणारी अलिसा खान या अभिनेत्रीला दिल्लीच्या ...

इमरान हाश्मीची हिरोईन रस्त्यांवर काढतेय रात्र!
इ रान हाश्मी याच्यासोबत ‘आईना’ चित्रपटात (‘आईना’ हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही.) काम करणारी अलिसा खान या अभिनेत्रीला दिल्लीच्या रस्त्यांवर दिवस काढावे लागत आहे. बॉयफे्रन्डने अलिसाचा एमएमएस व्हायरल केला आणि बदनामीच्या भीतीने कुटुंबाने अलिसाला घरातून हाकलून दिले. आता अलिया दिल्लीच्या रस्त्यांवर राहते आहे. तिच्याजवळ ना खाण्यासाठी पैसे आहेत ना जगण्यासाठी. दिवसभर रस्त्यांवर भटकायचे आणि रात्री मंदिरात झोपायचे, अशी स्थिती अलिसावर ओढवलीय. अलिसाच्या प्रियकराने तिला तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ पब्लिक करण्याची धमकी दिली होती. असे नको असेल तर ५० लाख रुपए दे,असे म्हणून तो तिला ब्लॅकमेल करीत होता. अलिसाने पैसे न दिल्यामुळे त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला. यामुळे अलिसाच्या घरचे इतके संतापले की त्यांनी अलिसाला घराबाहेर काढले. ‘माय हसबन्ड वाइफ’ या चित्रपटातही अलिसा दिली होती. केसी बोकाडिया यांच्या ‘डर्टी डान्सर’मध्येही त दिसली होती.