'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? श्रद्धा कपूरनं 'जूडी हॉप्स' पात्राला हिंदीत दिलाय आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:27 IST2026-03-11T18:26:16+5:302026-03-11T18:27:13+5:30

'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊया.

Zootopia 2 Ott Release Date Jiohotstar Shraddha Kapoor Hindi Voice Box Office | 'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? श्रद्धा कपूरनं 'जूडी हॉप्स' पात्राला हिंदीत दिलाय आवाज

'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? श्रद्धा कपूरनं 'जूडी हॉप्स' पात्राला हिंदीत दिलाय आवाज

Zootopia 2 OTT Release : 'झूटोपिया' (Zootopia) हा एक लोकप्रिय अमेरिकन ॲनिमेटेड चित्रपट आहे. वॉल्ट डिस्ने अ‍ॅनिमेशन स्टुडिओचा हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. गेल्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सिनेमागृहात चित्रपटाचा सिक्वेल 'झूटोपिया २'  प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता चाहते या चित्रपटाची ओटीटीवर आतुरतेने वाट पाहतायत.  'झूटोपिया २' ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊया. 

'झूटोपिया २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले असून आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने 'ज्युडी हॉप्स' या मुख्य पात्राला आपला आवाज दिला आहे.  हा चित्रपट ११ मार्च २०२६ पासून 'डिस्ने+ हॉटस्टार'वर जागतिक स्तरावर स्ट्रीम केला जाईल. भारतात हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी JioHotstar या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

काय आहे 'झूटोपिया २' ची कथा?
'झूटोपिया २' या चित्रपटात ज्युडी हॉप्स आणि निक वाइल्ड एका नवीन आणि रहस्यमय केसचा तपास करताना दिसतात. ते एका अज्ञात ठिकाणी जातात, जिथे त्यांना गॅरी डी'स्नेक नावाचा एक रहस्यमय साप भेटतो. झूटोपोलिस शहराचे नवीन भाग एक्सप्लोर केले जातात आणि शहरात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपस्थितीमागील सत्य उलगडले जाते.  'झूटोपिया' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि आता 'झूटोपिया २' मध्ये कथा, नवी पात्रं आणि ॲक्शनचा डबल डोस आहे.

Web Title : 'ज़ूटोपिया 2' ओटीटी पर कब: श्रद्धा कपूर की आवाज़ में देखें!

Web Summary : लोकप्रिय एनिमेटेड फिल्म 'ज़ूटोपिया 2' 11 मार्च, 2026 से डिज़्नी+ हॉटस्टार पर स्ट्रीम होगी। भारत में यह 13 मार्च, 2026 से जियो हॉटस्टार पर उपलब्ध होगी। श्रद्धा कपूर ने हिंदी संस्करण में जुडी हॉप्स को आवाज दी है।

Web Title : 'Zootopia 2' OTT Release Date: When and Where to Watch?

Web Summary : 'Zootopia 2,' a sequel to the popular animated film, will stream on Disney+ Hotstar globally from March 11, 2026. In India, it will be available on JioHotstar from March 13, 2026. Shraddha Kapoor voices Judy Hopps in the Hindi version.