​झेन मलिक आजमावतोय अभिनयात नशिब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 13:22 IST2016-11-08T13:22:34+5:302016-11-08T13:22:34+5:30

प्रसिद्ध बॉय बँड ‘वन डेरिक्शन’चा सदस्य झेन मलिक संगीत क्षेत्रानंतर आता अभिनयात नशिब आजमावू पाहतोय. लवकरच तो एका टीव्ही ...

Zen Malik is trying the novel luck | ​झेन मलिक आजमावतोय अभिनयात नशिब

​झेन मलिक आजमावतोय अभिनयात नशिब

रसिद्ध बॉय बँड ‘वन डेरिक्शन’चा सदस्य झेन मलिक संगीत क्षेत्रानंतर आता अभिनयात नशिब आजमावू पाहतोय. लवकरच तो एका टीव्ही सिरीजमध्ये काम करताना दिसण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रियावरून तर त्याच्या चाहत्यांना जणू काही स्वप्न पूर्ण झाल्यागत आनंद होताना दिसतोय.

‘लॉ अँड आॅर्डर’ सिरीजचे लेखक डिक आणि नोएले वुल्फ यांच्या आगामी ‘बॉइज्’ नावाच्या मालिकेत तो कार्यकारी निर्माता म्हणून काम बघणार आहे. तसेच काही एपिसोड्समध्ये तो अभिनयदेखील करणार असल्याचे कळतेय. सुत्रांनुसार, या संधीमुळे झेन खूप उत्साहित असून एक चॅलेंज म्हणून तो याकडे पाहतो.

त्यांच्या मते, ‘इतर निर्मात्यांशी त्याची बोलणी सुरू असून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी तो उत्सुक आहे. निर्माता म्हणून क्रिएटिव्ह नियंत्रण त्याच्या हातात असल्यामुळे अभिनयासाठी ही उत्तम संधी असल्याचे तो मानतो.’

शोमध्ये तो ‘झेन मलिक’ म्हणूनच दिसणार आहे. सध्या तरी बोलणी सुरुवातीच्या पातळीवर असून अंतिम निर्णय काय होतो हे निश्चित नाही. पण तत्पूर्वी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी तो अत्यंत गांभीर्याने घेत असून भविष्यात टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात मोठी उडी घेण्यासाठी त्याला हा अनुभव खूप काही येईल.

वन डिरेक्शन

यापूर्वी त्याचा बँड सहकारी हॅरी स्टायलसने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केलेली आहे. क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ‘डनकर्क’ या द्वितीय विश्वयुद्धावर बेतलेल्या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बहुधा त्याच्याकडूनच प्रेरणा घेऊन झेनसुद्धा आता करिअर बदलू पाहतोय. 

इंग्लंडमधील एका सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोद्वारे एकत्र येऊन ‘वन डिरेक्शन’ हा म्युझिकल बँड उदयास आला होता. पाच जणांचा सामावेश असलेला हा बॉय बँड थोड्याच कालावधीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. अनेक सुपरहीट गाणी दिल्यानंतर त्यांनी तात्पुरता ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘१-डी’च्या फॅन्सना झेनच्या अ‍ॅक्टिंग गीगमुळे आनंद होणे स्वाभाविक आहे.

Web Title: Zen Malik is trying the novel luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.