लॉकडाऊनदरम्यानही जगातील २० फिल्म फेस्टीव्हला मिळाला ग्रीन सिग्नल, युट्युब स्ट्रीमिंग द्वारे पार पडणार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 14:49 IST2020-04-28T14:47:10+5:302020-04-28T14:49:11+5:30
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे घेतलेला हा निर्णय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. २९ मे पासून युट्युबवर या फेस्टीव्हलला सुरूवात होणार आहे. सर्वच प्रकारच्या सिनेमांचा यात समावेश असणार आहे.

लॉकडाऊनदरम्यानही जगातील २० फिल्म फेस्टीव्हला मिळाला ग्रीन सिग्नल, युट्युब स्ट्रीमिंग द्वारे पार पडणार सोहळा
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील 29 लाख 21 हजार 513 लोक संक्रमित झाले आहेत. तर, दोन लाख 3 हजार 299 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आतापर्यंत 8 लाख 37 हजार 30 रुग्ण ठीक झाले आहेत.कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश जवळपास महिनाभरापासून लॉकडाऊनमध्ये आहे याचा फटका सर्वच प्रकारच्या उद्योगधंद्यावर बसला आहे. कोरोनाचे संकाटापासून एंटरटेमेंट इंडस्ट्री देखील वाचलेली नाही. मात्र सर्वत्रच एकही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा फटका सहन करावा लागतोय. तसेच मोठ्या प्रमाणावर या काळात फिल्म फेस्टीव्हलही होतात. लॉकडाऊन असले म्हणून काय झाले जगातील २० फिल्म फेस्टीव्हल रद्द करण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊनमध्येही फिल्म फेस्टीव्हल करावे अशी भन्नाट कल्पना सुचली आणि त्यानुसार एकत्र येऊन युट्युबवर त्याचे स्ट्रीमिंग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कान्स आणि न्युयॉर्क फिल्म फेस्टीव्हलमध्ये शोकेस होणारे सिनेमा आता सा-यांना घर बसल्या युट्युबवर पाहता येणार आहेत. बर्लिन, कान्स,टोरँटो, ट्रीबेका, व्हेनिस या सारख्या जगविख्यात फिल्म फेस्टीव्हल संस्था आता यासाठी एकत्र आल्या आहेत. आजपर्यंत असा प्रयोग कधीच झाला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे घेतलेला हा निर्णय ऐतिहासिकच म्हणावा लागेल. २९ मे पासून युट्युबवर या फेस्टीव्हलला सुरूवात होणार आहे. सर्वच प्रकारच्या सिनेमांचा यात समावेश असणार आहे.
डिजिटली होणा-या या फेस्टीव्हल विनाशुल्क असणार आहे. तसेच ज्यांना काही धनराशी देण्याची इच्छा असेल त्यांनी WHO कोविड-१९ या उपक्रमास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.