ब्लॅक चीनाने पोस्ट केला असाही व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 13:11 IST2016-11-16T13:11:47+5:302016-11-16T13:11:47+5:30

हॉलिवूड स्टार्स कधी कुठला व्हिडीओ शेअर करतील हे सांगणे मुश्किलच आहे. आता हेच बघा ना अमेरिकन टीव्ही स्टार ब्लॅक चीना हिने मुलाला जन्म देतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही व्हिडीओमध्ये दिसत असून, हॉस्पिटलचे कर्मचारी अतिशय उत्साहात तिच्या बाळाच्या आगमनाचे स्वागत करीत आहेत.

Video that Black China posted | ब्लॅक चीनाने पोस्ट केला असाही व्हिडीओ

ब्लॅक चीनाने पोस्ट केला असाही व्हिडीओ

लिवूड स्टार्स कधी कुठला व्हिडीओ शेअर करतील हे सांगणे मुश्किलच आहे. आता हेच बघा ना अमेरिकन टीव्ही स्टार ब्लॅक चीना हिने मुलाला जन्म देतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही व्हिडीओमध्ये दिसत असून, हॉस्पिटलचे कर्मचारी अतिशय उत्साहात तिच्या बाळाच्या आगमनाचे स्वागत करीत आहेत. 
हा व्हिडिओ मॅनिकन चॅलेंजचा एक भाग आहे. आई होणाºया ब्लॅक चीनाचा मॅनिकन चॅलेंज घेतानाचा व्हिडिओ आहे. यात ती मुलाला जन्म देण्याच्या पोजमध्ये दिसत आहे. तिच्यासोबत होणारा पती रॉब कर्दाशियन आणि होणारी सासू क्रिस जेन्नरही दिसत आहे.
व्हिडिओतील सर्व लोक मॅनिकनच्या रुपात दिसत आहेत. व्हिडिओत पोज देणारे सर्व लोक रुग्णालयात आहेत आणि मुलाला जन्म देण्याच्या सीनची अ‍ॅक्टींग करीत आहेत. व्हिडीओ बघताना असे वाटते की, ब्लॅक चीना जणू काही मुलाला जन्म देत आहे. तसेच ज्या पद्धतीने इतर लोक अ‍ॅक्टिंग करीत आहेत, त्यावरून तर ती मुलाला जन्म देते असा भास झाल्याशिवाय राहत नाही. 
दरम्यान ब्लॅक चीना सध्या गर्भवती असून, या मुलाच्या जन्माबद्दल चीना चिंतेत आहे. कारण तिला तिच्या फिगरची काळजी वाटते. मुलाच्या जन्मानंतर ५८ किलो वजन बनवण्याचा तिचा प्रयत्न राहणार आहे. आता तिचे वजन ८३ किलो असून, ती फिटनेसकडे विशेष लक्ष देवून आहे. 
यापूर्वीच चीनाने डिलिव्हरीनंतर वजन कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी ती आतापासूनच विशेष खबरदारी घेत असताना बघावयास मिळत आहे. 

Web Title: Video that Black China posted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.