बापरे! 'डोन्ट वरी डार्लिंग'च्या प्रिमियरमध्ये हॅरी स्टाइल्स सहकाऱ्यावर खरंच थुंकला? मॅनेजरने सांगितलं Viral Videoचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 16:46 IST2022-09-07T16:39:28+5:302022-09-07T16:46:32+5:30

79 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'डोंट वरी डार्लिंग' या हॉलिवूड चित्रपटाचा प्रीमियर झाला. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Venice film festival dont worry darling premiere Chris pine manager reacts to harry styles spitgate | बापरे! 'डोन्ट वरी डार्लिंग'च्या प्रिमियरमध्ये हॅरी स्टाइल्स सहकाऱ्यावर खरंच थुंकला? मॅनेजरने सांगितलं Viral Videoचं सत्य

बापरे! 'डोन्ट वरी डार्लिंग'च्या प्रिमियरमध्ये हॅरी स्टाइल्स सहकाऱ्यावर खरंच थुंकला? मॅनेजरने सांगितलं Viral Videoचं सत्य

Venice Film Festival: हॅरी स्टाइल्स, ख्रिस पाइन आणि ऑलिव्हिया वाइल्ड स्टारर 'डोंट वरी डार्लिंग'चा 79 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला. या प्रीमियरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  व्हिडिओ शेअर करताना लोकांनी सांगितले की, अभिनेता हॅरी स्टाइल्स 'वंडर वुमन' फेम ख्रिस पाइनवर थुंकतोय. प्रीमियर दरम्यान ख्रिस आणि हॅरी एकमेकांच्या शेजारी बसले होते. आता ख्रिस पाइनच्या मॅनेजरने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

 ट्विटरवर एका युजरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हॅरी स्टाइल्स त्याच्या सीटवर बसताना दिसत आहेत. ख्रिस पाइन त्याच्या शेजारी बसला आहे. हॅरी त्याच्या जागेवर बसताच, पाइन टाळ्या वाजवणे थांबवतो. त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थ भाव देतो आणि नंतर तो पुन्हा टाळ्या वाजवतो. 

लोक या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत आणि हॅरीच्या स्टाइल्सवर टीका करत आहेत. मात्र ख्रिस पाइनच्या मॅनेजरने यावर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की हॅरी ख्रिसवर थुंकला नाही. पीपुल डॉट कॉमला दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, ही एक बनावट गोष्ट आहे, जी केवळ अफवा आहे.


अभिनेते एकमेकांचा आदर करतात
ख्रिस पाइनचा मॅनेजर  म्हणाला, "हॅरी स्टाइल्स ख्रिस पाइनवर थुंकला नाही. दोन्ही सहकलाकार एकमेकांचा आदर करतात आणि त्यांच्यात काहीही नाही आहे. अशा बातम्या केवळ नाटक आणि अफवा आहेत, त्यात तथ्य नाही.

 23 सप्टेंबरला रिलीज होणार चित्रपट
डोंट वरी डार्लिंगचा प्रीमियर 5 सप्टेंबर (सोमवार) रोजी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला, ज्यात हॅरी स्टाइल्स आणि ख्रिस पाइनसह सह-कलाकार फ्लोरेन्स पग आणि दिग्दर्शक ऑलिव्हिया वाइल्ड देखील उपस्थित होते. 23 सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Venice film festival dont worry darling premiere Chris pine manager reacts to harry styles spitgate