​बॉयफ्रेंडच्या आजी ‘राणी’ला भेटायला मेघनपाशी नाही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 13:29 IST2016-11-15T13:20:54+5:302016-11-15T13:29:07+5:30

इंग्लंडचा राजपुत्र हॅरीला डेट करणाऱ्या ‘सुटस्’ स्टार मेघन मार्केलपाशी त्याची आजी अर्थात महाराणी एलिझाबेथला भेटण्यासाठी वेळ नाही. मागच्या आठवड्यात ...

There is no time for megastar to meet the grandfather's queen | ​बॉयफ्रेंडच्या आजी ‘राणी’ला भेटायला मेघनपाशी नाही वेळ

​बॉयफ्रेंडच्या आजी ‘राणी’ला भेटायला मेघनपाशी नाही वेळ

ग्लंडचा राजपुत्र हॅरीला डेट करणाऱ्या ‘सुटस्’ स्टार मेघन मार्केलपाशी त्याची आजी अर्थात महाराणी एलिझाबेथला भेटण्यासाठी वेळ नाही. मागच्या आठवड्यात हॅरी आणि मेघनने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर ती हॅरीच्या कुटुंबियांना भेटणार असल्याची चर्चा होती.

त्यानुसार ती नुकतीच इंग्लंडला गेली होती. परंतु या दौऱ्यात तिने महाराणीची भेट घेतली नाही. यावेळी ती हॅरीचे वडिल प्रिन्स चार्ल्स यांनासुद्धा भेटणार होती. कामाच्या अडचणीमुळे तिला अर्ध्यातूनच कॅनडला परत जावे लागले. तिच्या अशा वागण्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सुत्रांनुसार, ‘हॅरी महाराणी आणि वडिलांशी मेघनची औपचारिक ओळख करून देणार होता. परंतु तिच्या अतिव्यस्त शेड्यूलमुळे ते शक्य झाले नाही. कॅनडातील टोरोंटो शहरात तिच्या ‘सुटस्’ मालिके ची शूटींग सुरू आहे. त्यामुळे तिला अचानक परत जावे लागले. आणि तसेही तिचा हा दौरा अत्यंत कमी दिवसांचा होता.’


द रॉयल्स : महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स हॅरी


द रॉयल्स : प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्स

तत्पूर्वी हॅरीने यंदा हॅलोविन मेघनसोबत साजरा केला. त्यासाठीतो गुपचुप कॅनडाला गेला होता. यावेळी तो तिच्याच अपार्टमेंटमध्ये थांबला होता. ही बातमी जेव्हा मीडियामध्ये पसरली तेव्हा दोघांच्या नात्याची खबर जगाला क ळाली. म्हणून तर गेल्या आठवड्यात दोघांनी या नात्याला अधिकृत स्वीकृती दिली.

मेघनचे यापूर्वी ट्रेव्हर इंगल्सनशी लग्न झाले होते. दोन वर्षांच्या संसारानंतर तिने त्याला २०१३ साली घटस्फोट दिला. प्रसिद्ध इंग्लिश कोर्ट-ड्रामा सिरीज ‘सुटस्’मधील तिची ‘रेचल झेन’ भूमिका अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच तिने काही चित्रपटांतूनही काम केलेले आहे. एका म्युचुअल मित्राने हॅरी आणि मेघनची भेट घडवून आणली होती.

वाचा : ​​प्रिन्स हॅरीची ‘सुटस्’ गर्लफ्रेंड

वाचा : प्रिन्स हॅरीसोबत काय आहे प्रियांकाचे ‘कनेक्शन’?

Web Title: There is no time for megastar to meet the grandfather's queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.