धक्कादायक! 'द लायन किंग' फेम अभिनेत्रीची हत्या, धारदार चाकूने केले वार; बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:32 IST2025-12-25T11:30:58+5:302025-12-25T11:32:34+5:30
हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री इमानी दिया स्मिथ हिचं निधन झालं आहे. इमानी ही फक्त २५ वर्षांची होती.

धक्कादायक! 'द लायन किंग' फेम अभिनेत्रीची हत्या, धारदार चाकूने केले वार; बॉयफ्रेंडला पोलिसांनी केली अटक
हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री इमानी दिया स्मिथ हिचं निधन झालं आहे. इमानी ही फक्त २५ वर्षांची होती. रविवारी (२१ डिसेंबर) रोजी इमानीसोबत धक्कादायक प्रकार घडला. इमानी न्यू जर्सी मधील एडिसन शहरात वास्तव्यास होती. रविवारी तिच्या घरातून पोलिसांना फोन करण्यात आला होता. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना इमानी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तिच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. ज्यामध्ये इमानी गंभीर जखमी झाली होती. इमानीला तातडीने रॉबर्ट वुड जॉनसन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
इमानीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी हत्या झाल्याच्या तक्रारीची नोंद केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून इमानीचा बॉयफ्रेंड जॉर्डन डी जॅकसन स्मॉल याच्यावर अभिनेत्रीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी(२३ डिसेंबर) पोलिसांनी ३५ वर्षीय जॉर्डनला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. इमानीच्या हत्येने हॉलिवूडला हादरवून टाकलं आहे. तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इमानीच्या मागे तिचे आई-वडील, भाऊ, बहीण आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
इमानीची हत्या झाली तेव्हा तिचा ३ वर्षांचा मुलगा घरातच होता, अशी माहिती मिळत आहे. इमानीने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. २०११ मध्ये तिने द लायन किंग या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. तिच्या मृत्यूने चाहत्यांनाही जबर धक्का बसला आहे.