सिनेसृष्टी हळहळली; प्रसिद्ध सिंगरवर दु:खाचा डोंगर, १० महिन्याच्या नातीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:50 IST2026-02-01T18:49:32+5:302026-02-01T18:50:04+5:30

हॉलिवूड विश्वातून एक दु:खद घटना समोर येत आहे. प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर स्नूप डॉगवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्नूप डॉगच्या नातीचं निधन झालं आहे. ती अवघी १० महिन्यांची होती.

singer and rapper snoop dogg 10 months old granddaughter death | सिनेसृष्टी हळहळली; प्रसिद्ध सिंगरवर दु:खाचा डोंगर, १० महिन्याच्या नातीचं निधन

सिनेसृष्टी हळहळली; प्रसिद्ध सिंगरवर दु:खाचा डोंगर, १० महिन्याच्या नातीचं निधन

हॉलिवूड विश्वातून एक दु:खद घटना समोर येत आहे. प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर स्नूप डॉगवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्नूप डॉगच्या नातीचं निधन झालं आहे. ती अवघी १० महिन्यांची होती. २६ जानेवारीला ही दु:खद घटना घडली. स्नूप डॉगची नात कोडी ड्रेक्स ही त्याच्या मुलीची मुलगी होती. काही दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये होती. मात्र घरी येताच तिची प्राणज्योत मालवली. 

१० महिन्याच्या कोडी ड्रेक्सच्या निधनाने स्नूप डॉगच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्नूप डॉगची छोटी मुलगी कोरी ब्रॉड्स हिने तिच्या लेकीच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे. लेकीसोबतचा फोटो शेअर करत तिने हे दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. "आमच्या आयुष्यातील प्रेम आमच्यापासून दूर गेलं...माझी मुलगी", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

कोरी ब्रॉड्स हिने मार्च महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. बेबी कोडीच्या रुपात तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली होती. मात्र तिच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. कोरीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title : स्नूप डॉग की 10 महीने की पोती का निधन, परिवार में शोक की लहर

Web Summary : रैपर स्नूप डॉग की 10 महीने की पोती, कोडी का निधन हो गया। उनकी बेटी, कोरी ब्रॉडस ने सोशल मीडिया पर यह दुखद खबर साझा की, और अपनी बच्ची के गुज़र जाने पर गहरा दुख व्यक्त किया। परिवार इस अचानक नुकसान से सदमे में है।

Web Title : Snoop Dogg's Granddaughter, 10 Months Old, Passes Away, Family Mourns

Web Summary : Rapper Snoop Dogg is grieving the loss of his 10-month-old granddaughter, Kodi. His daughter, Cori Broadus, shared the heartbreaking news on social media, expressing deep sorrow over the passing of her baby girl. The family is devastated by the sudden loss.