१९ वर्षांनंतर शकीराचा भारत दौरा! मुंबई-दिल्लीत होणार 'धमाका'; कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:27 IST2026-03-02T14:57:43+5:302026-03-02T15:27:36+5:30

शकीराचे हे कॉन्सर्ट मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख शहरांमध्ये पार पडणार आहेत.

Shakira India Tour After 19 Years In Mumbai’s Delhi Ticket Priced Details Inside | १९ वर्षांनंतर शकीराचा भारत दौरा! मुंबई-दिल्लीत होणार 'धमाका'; कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये?

१९ वर्षांनंतर शकीराचा भारत दौरा! मुंबई-दिल्लीत होणार 'धमाका'; कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये?

Shakira India Tour : जगप्रसिद्ध आयकॉन शकीरा (Shakira) तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी सज्ज झाली आहे. २००७ मधील 'ओरल फिक्सेशन टूर'नंतर आता २०२६ मध्ये शकीरा भारतात दोन भव्य कॉन्सर्ट करणार आहे. मात्र, या कॉन्सर्टच्या तिकिटांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

शकीराचे हे कॉन्सर्ट मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख शहरांमध्ये पार पडणार आहेत. १० एप्रिल २०२६ रोजी मुंबई (महालक्ष्मी रेसकोर्स) आणि १५ एप्रिल २०२६र रोजी दिल्ली (जवाहरलाल नेहरू स्टेडियम) या ठिकाणी होतील. शकीराची जबरदस्त ऊर्जा, तिचे खास डान्स मुव्ह्स आणि सुपरहिट गाणी अनुभवण्यासाठी भारतीय चाहते प्रचंड उत्सुक आहेत. 

तिकिटांच्या किमती किती?
या कॉन्सर्टची तिकिटे सध्या झोमॅटोच्या (Zomato) 'डिस्ट्रॅक्ट' प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. लोकप्रियतेमुळे तिकिटांचे दर वेगाने वाढत आहेत. मुंबईतील कॉन्सर्टसाठी मूळ तिकीट २८,००० पासून सुरू होत असून, काही श्रेणींमध्ये ही किंमत ३२,००० च्याही पुढे गेली आहे. महागडी तिकिटे असूनही चाहत्यांनी बुकिंगसाठी मोठी गर्दी केली आहे.


आपल्या भारत दौऱ्याबद्दल बोलताना शकीरा म्हणाली, "भारतात सादरीकरण करणे माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. मी मुंबई आणि दिल्लीतील चाहत्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. हा 'फीडिंग इंडिया' (Feeding India) कॉन्सर्ट केवळ संगीतापुरता मर्यादित नाही; तर प्रत्येक मुलाला निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेले पोषण मिळावे, यासाठी एकत्र येण्याचा हा एक प्रयत्न आहे".

Web Title : 19 साल बाद शकीरा का भारत दौरा: कॉन्सर्ट विवरण और टिकट की कीमतें

Web Summary : शकीरा 19 साल बाद 2026 में मुंबई और दिल्ली में कॉन्सर्ट के लिए भारत लौट रही हैं। टिकट ज़ोमैटो के 'डिस्ट्रेक्ट' पर उपलब्ध हैं, मुंबई में ₹28,000 से शुरू। शकीरा का उद्देश्य 'फीडिंग इंडिया' का समर्थन करना, हर बच्चे के लिए पोषण सुनिश्चित करना है।

Web Title : Shakira's India Tour After 19 Years: Concert Details & Ticket Prices

Web Summary : Shakira returns to India after 19 years for concerts in Mumbai and Delhi in 2026. Tickets are available on Zomato's 'Distract', starting at ₹28,000 in Mumbai. Shakira aims to support 'Feeding India', ensuring nutrition for every child.