​‘द रॉक’ ठरला ‘सेक्सियस्ट मॅन अलाईव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 15:01 IST2016-11-16T14:57:12+5:302016-11-16T15:01:33+5:30

‘हा सन्मान म्हणजे मी यशोशिखरावर पोहचलो आहे याची पावती आहे’, अशी त्याने प्रतिक्रिया दिली

'The Rock' becomes 'Sexiest Man Alive' | ​‘द रॉक’ ठरला ‘सेक्सियस्ट मॅन अलाईव्ह’

​‘द रॉक’ ठरला ‘सेक्सियस्ट मॅन अलाईव्ह’

र्व ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ चॅम्पियन आणि हॉलीवूड सुपरस्टार ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सनची एका मॅगझीनने जगातील सर्वात ‘सेक्सी पुरुष’ म्हणून निवड केली आहे. इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींना मागे टाकत ‘द रॉक’ला लोकांनी ‘सेक्सियस्ट मॅन आलईव्ह’ खिताबाचा मानकरी ठरवले.

ही गोष्ट ऐकून त्याने प्रतिक्रिया दिली की, ‘हा सन्मान म्हणजे मी यशोशिखरावर पोहचलो आहे याची पावती आहे.’ गेल्या वर्षी हा बहुमान इंग्लंडचा माजी फुटबॉल प्लेयर डेव्हिड बेकहॅमला मिळाला होता. तसेच क्रिस हेम्सवर्थ, अ‍ॅडम लेव्हाईन, चॅनिंग टॅटम हेदेखील यापूर्वी ‘सेक्सियस्ट मॅन आलईव्ह’ राहिलेले आहेत.

प्रियांका चोप्रा स्टारर ‘बेवॉच’ सिनेमात ड्वेन प्रमुख भूमिकेत असून ‘मोना’ नावाच्या अ‍ॅनिमेशनपटातही त्याने आवाज दिलेला आहे. तत्पूर्वी त्याने संधी मिळाल्यास अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचेही सांगितले होते. मागच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांचया अनपेक्षित विजयावर बोलताना तो म्हणाला की ,‘या जगात काहीही होऊ शकते!’


‘मला जर संधी मिळाली तर लोक कल्याणासाठी मी नक्कीच अध्यक्ष होईल. यंदाच्या निवडणूकीतून तर सिद्ध झाले की, या जगात अशक्य काहीच नाही. मग मीसुद्धा प्रेझिडेंट होऊ शकतो,’ असे तो म्हणाला.

तसे पाहिले गेले तर त्याला कोणताच राजकीय अनुभव नाही; परंतु तो अनेक वेळा राजकीय कार्यक्रमांत सहभागी झालेला आहे. २००० साली झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याने तरुण मुलांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.

खरंच जर ‘द रॉक’ अमेरिकेचा अध्यक्ष झाला तर कसे होईल? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नेहमी लक्षा ठेवा - कुछ भी हो सकता है!

Web Title: 'The Rock' becomes 'Sexiest Man Alive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.