प्रियंका चोप्राचा पती निक जोनस करतोय गंभीर आजाराशी सामना, कॉन्सर्ट केले रद्द; नेमकं झालं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:17 AM2024-05-05T09:17:46+5:302024-05-05T09:19:32+5:30

 निक जोनास याला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे.

Priyanka Chopra Husband Nick Jonas Diagnosed Influenza A Shared Video Cancel Shows And Apology To Fans | प्रियंका चोप्राचा पती निक जोनस करतोय गंभीर आजाराशी सामना, कॉन्सर्ट केले रद्द; नेमकं झालं तरी काय?

प्रियंका चोप्राचा पती निक जोनस करतोय गंभीर आजाराशी सामना, कॉन्सर्ट केले रद्द; नेमकं झालं तरी काय?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas)  यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियंकाचा पती पॉपस्टार निक जोनास हा चर्चेत आला आहे.  निक जोनास याला एका गंभीर आजाराची लागण झाली आहे. निकने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे.

निक जोनासला 'इन्फ्लुएंझा ए' हा आजार झाला आहे. त्यामुळे निकने त्याचे शो रद्द केले असून चाहत्यांची माफी मागितली आहे.  याबद्दल व्हिडीओ शेअर करत निक म्हणाला, 'नमस्कार मित्रांनो, आज माझ्याकडे एक बातमी आहे, जी अजिबात मजेदार नाही. मी सध्या  'इन्फ्लुएंझा ए' या आजाराशी लढत आहे. मला अजिबात बरं वाटत नाहीये. मी सध्या गाणं गाण्यास असमर्थ असून तुम्हाला नेहमीसारखा बेस्ट शो देऊ इच्छितो मात्र ते आता होऊ शकणार नाहीये'.

पुढे तो म्हणाला,  'काही दिवसांपासून मला वेगळं वाटत होतं. जेव्हा मी उठलो तेव्हा माझा आवाज पूर्ण बसलेला होता. गेल्या दोन दिवसात ही परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. मला खूप ताप, अंगदुखी आणि घसा खवखवतोय. अशा अवस्थेत मी कॉन्सर्ट करू शकणार नाही. 'तुम्हांला निराश करणे मला अजिबात आवडत नाही. मी तुमची माफी मागतो'. आता निकचे शो हे ऑगस्टमध्ये होणार आहेत.

इन्फ्लुएंझा ए हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यात विषाणू हवेतून पसरतात आणि तुमच्या फुफ्फुसांवर अटॅक करतात. इन्फ्लूएंझा ए संसर्गाच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, स्नायू दुखणे, खोकला आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. निक याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक चाहते निकसाठी प्रार्थना करत आहेत.

Web Title: Priyanka Chopra Husband Nick Jonas Diagnosed Influenza A Shared Video Cancel Shows And Apology To Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.