या गायिकेवर अनेक दिवस करण्यात आला होता बलात्कार, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 18:11 IST2020-04-08T18:10:44+5:302020-04-08T18:11:15+5:30

या गायिकेने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट घटनेविषयी लिहिले आहे.

Pop star Duffy says she was raped PSC | या गायिकेवर अनेक दिवस करण्यात आला होता बलात्कार, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली व्यथा

या गायिकेवर अनेक दिवस करण्यात आला होता बलात्कार, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली व्यथा

ठळक मुद्देडफीच्या आयुष्यात ही गोष्ट कधी घडली याबाबत तिने सांगितलेले नाहीये. माझ्यासोबत जे काही घडले ते मला लोकांसोबत शेअर करायचे नव्हते. त्यामुळेच मी शांत बसले असे देखील तिने सांगितले आहे.

जगभरातील स्त्रियांना लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. कोणत्याच देशातील स्त्रिया या सुरक्षित नाहीयेत. केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील अनेक वेळ लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. वेल्सची पॉपस्टार गायिका डफीने तिच्या आयुष्यातील एक अतिशय वाईट अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे. तिने सोशल मीडियाद्वारे अंगावर काटा आणणारा हा अनुभव सगळ्यांना सांगितला आहे.

द गार्डियन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, डफीने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे की, माझा वाढदिवस होता. त्यावेळी एका हॉटेलमध्ये मला काही दिवस कोंडून ठेवण्यात आले आणि त्या दरम्यान मला ड्रग्स देखील देण्यात आले. एवढेच नव्हे तर मला दुसऱ्या देशात देखील नेण्यात आले. मला तिथे नेल्यावर एका हॉटेलच्या खोलीत कित्येक दिवस ठेवण्यात आले होते. यावेळी माझ्यावर बलात्कार देखील करण्यात आला. मी शुद्धीवर आल्यानंतर माझ्यासमोर एक अनोळखी माणूस होता. त्याने मला निमुटपणे त्याच्या पाठीमागे चालायला सांगितले. सगळ्या गोष्टी मला लक्षात आल्यामुळे तिथून कशी तरी मी स्वतःची सुटका करून घेतली. माझ्या आयुष्यातील तो वाईट प्रसंग मी कधीच विसरणार नाही. या सगळ्यातून मी माझा कसा तरी जीव वाचवला. आता मी या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. 

डफीच्या आयुष्यात ही गोष्ट कधी घडली याबाबत तिने सांगितलेले नाहीये. माझ्यासोबत जे काही घडले ते मला लोकांसोबत शेअर करायचे नव्हते. त्यामुळेच मी शांत बसले असे देखील तिने सांगितले आहे. तसेच डफीने सोशल मीडियावरची तिची ती पोस्ट देखील डीलिट केली आहे. 

Web Title: Pop star Duffy says she was raped PSC