गंभीर दुखापतीने त्रस्त आहे 'ही' पॉपस्टार, म्हणाली 'आता फक्त देवच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:27 IST2022-11-08T17:26:34+5:302022-11-08T17:27:55+5:30

नर्व्ह डॅमेजच्या दुखापतीमुळे तिला झोप लागणे ही कठीण झाले आहे तरी डान्स केल्याने दुखणे विसरायला होते असे तिने पोस्ट मध्ये म्हणले आहे.

pop-star-britney-spears-suffering-from-serious-injury-says-only-god-can-help | गंभीर दुखापतीने त्रस्त आहे 'ही' पॉपस्टार, म्हणाली 'आता फक्त देवच...'

गंभीर दुखापतीने त्रस्त आहे 'ही' पॉपस्टार, म्हणाली 'आता फक्त देवच...'

हॉलिवूड पॉपस्टार ब्रिटनी स्पिअर्स हिच्या शरिराच्या डाव्या बाजुला दुखापत झाली आहे. या परिस्थितीतही तिने डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या पोस्टवर एक मोठे कॅप्शन देत तिने या दुखापतीबद्दल सांगितले आहे. या दुखापतीमुळे तिला झोप लागणे ही कठीण झाले आहे तरी डान्स केल्याने दुखणे विसरायला होते असे तिने पोस्ट मध्ये म्हणले आहे.

तिने पोस्ट मध्ये म्हणले आहे, व्हिक्टोरिया मी नाचत आहे. हो डाव्या बाजुचे नर्व्ह डॅमेज झाले आहे. देवाशिवाय हे कोणीच बरे करु शकत नाही. जेव्हा तुमच्या मेंदुपर्यंत ऑक्सिजन पोहचत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. यामुळे शरिराचा काही भाग सुन्न होऊन जातो. ती पुढे म्हणते, 'यामध्ये शिरा लहान असतात आणि वेदनेची इतकी असते की हजारो पिना आणि सुया उजव्या बाजुला टोचल्या जात आहेत असो वाटते. तरी डान्स केल्याने या सर्व वेदना विसरायला होतात.'

नर्व्ह डॅमेज म्हणजे काय ?

मज्जातंतूच्या दुखापतीमुळे मेंदुचा स्नायू आणि इतर अवयवांशी संपर्क तुटतो. हे दुखणे फारच तीव्र असेल तर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. 

Web Title: pop-star-britney-spears-suffering-from-serious-injury-says-only-god-can-help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.