ऐकावं ते नवलच! या बिग बॉस कंटेस्टंटने चौथ्या लग्नासाठी देवाकडे केली याचना, म्हणतेय - फक्त देवा आणखीन एकदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 17:32 IST2020-06-02T17:31:14+5:302020-06-02T17:32:31+5:30
वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही या अभिनेत्रीला करायचंय चौथं लग्न, म्हणते की तीन लग्न खूप झाली पण पाचपेक्षा कमीच आहेत.

ऐकावं ते नवलच! या बिग बॉस कंटेस्टंटने चौथ्या लग्नासाठी देवाकडे केली याचना, म्हणतेय - फक्त देवा आणखीन एकदा
बिग बॉस कंटेस्टंट व अभिनेत्री पामेला एंडरसन पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार आहे. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पामेला एंडरसनने तिच्या मागील लग्नाबद्दल सांगितलं. यावेळी बोलताना तिने पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छादेखील सांगितली. तिला जेव्हा विचारले गेले की पुन्हा लग्न करणार का, त्यावर ती म्हणाली हो, साहजिक गोष्ट आहे. बस एकदा देवा. बस आणखीन एक. यापूर्वी पामेला तिनदा लग्नबेडीत अडकली आहे.
पामेला एंडरसनने मागील नात्याबद्दल सांगितलं की, देवाची आभारी आहे की हे झाले. मी इथे खुश आहे. माझी तीन लग्न झाली आहेत. लोकांना वाटतं की माझे पाच वेळा लग्न झालं आहे. माहित नाही. माझे तीन वेळाच लग्न झाले आहे. माझे टॉमी लीसोबत लग्न झाले. मग, बॉब रिचीसोबत आणि रिक सोलोमनसोबत विवाह झाला. मला माहित आहे की हे खूप आहे पण हे पाच पेक्षा कमी आहे.
तिने चौथ्या लग्नाबद्दल सांगितले की, हो. फक्त आणखीन एकदा. केवळ एकदा आणि देवा एकदाच.
मुलाखतीत 52 वर्षीय पामेला एंडरसनने जॉन पीटर्ससोबतच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले. ती म्हणाली की, माझे लग्न झाले नव्हते. मी रोमँटिक आहे आणि मला वाटते की मी सहज टार्गेट होते. मला वाटते की लोक भीतीमध्ये जपतात. मला माहित नाही हे सगळं कशाबद्दल आहे. पण मी मानते की भीती यामध्ये खूप खेळ खेळते. हे एका छोट्या क्षणासारखे आहे. एक क्षण जो येतो आणि जातो. मात्र यात कोणतं लग्न होत नाही, इथे काहीच होत नाही. मला वाटते की जसे काहीच घडले नाही.
पामेला एंडरसनने हॉलिवूडपटांसोबत बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधून खूप लोकप्रियता मिळवली होती.