पामेला एंडरसन शोधतेय युरोपमध्ये निवारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 22:04 IST2017-01-05T21:56:51+5:302017-01-05T22:04:08+5:30
‘बेवॉच’ अभिनेत्री पामेला एंडरसन युरोपमध्ये स्थायिक होऊ इच्छिते. फिमेल फर्स्ट डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पामेलाने सांगितले की, ...

पामेला एंडरसन शोधतेय युरोपमध्ये निवारा
‘ ेवॉच’ अभिनेत्री पामेला एंडरसन युरोपमध्ये स्थायिक होऊ इच्छिते. फिमेल फर्स्ट डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पामेलाने सांगितले की, कॅलिफोर्नियाच्या तुलनेत माझा युरोप आणि फ्रान्समध्ये अधिक मित्रपरिवार आहे. पामेला सध्या कॅलिफोर्निया येथे राहात आहे.
पामेलाने सांगितले की, सध्या मी लंडन किंवा पॅरिस येथे भाड्याचे घर शोधत आहे. मला युरोपमध्ये चेकर टेबलवर डान्स करणे किंवा जगभरात बोट चालवून आयुष्यातील पुढील वेळ व्यतीत करायला आवडेल. पामेलाने आफ्रिका येथेही बराचसा काळ घालवला आहे.
पामेला तिच्या सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते. ‘पोर्न’ इंडस्ट्रीच्या विरोधात तिने जंग छेडली असून, त्यासाठी ती जगभरात भम्रंती करीत आहे. ‘बेवॉच’मधून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री पामेल एंडरसन गेल्या काही महिन्यांपासून कॅलिफोनियातून बाहेर पडू इच्छिते. वेळोवेळी तिने याविषयीची इच्छाही व्यक्त केली.
युरोपमध्ये पामेलाचा मित्र परिवार मोठ्या संख्येने आहे. शिवाय बरेचसे हॉलिवूड सेलिब्रेटीही त्याठिकाणी स्थायिक झालेले असल्याने पामेला त्याठिकाणी जाण्यास सध्या धडपड करीत आहे. सध्या ती लंडन किंवा पॅरिसमध्ये निवारा शोधत असून, एका एजन्सीकडे तिने घर शोधण्याची जबाबदारी सोपविली आहे. २०१७ या वर्षातच कदाचित ती युरोपमध्ये स्थायिक होऊ शकते.
![]()