Oscar 2025: रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज, एड्रियन ब्रॉडी-हॅली बेरीचं किस चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 07:13 IST2025-03-03T07:10:46+5:302025-03-03T07:13:55+5:30
Oscar 2025: ऑस्करच्या रेड कार्पेटवर अनेक कलाकारांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर सर्वांसमोर एड्रियन ब्रॉडी आणि हॅली बेरीने किस करून सर्वांना थक्क केले आहे.

Oscar 2025: रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज, एड्रियन ब्रॉडी-हॅली बेरीचं किस चर्चेत
ऑस्कर २०२५ (Oscar Awards 2025) म्हणजेच ९७ वा अकादमी पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात लॉस अँजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडतो आहे. यंदा पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्टर कॉनन ओब्रायन करतो आहे. ऑस्करच्या रेड कार्पेटवर अनेक कलाकारांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर सर्वांसमोर एड्रियन ब्रॉडी आणि हॅली बेरीने किस करून सर्वांना थक्क केले आहे.
एरियाना ग्रांडेचा रेड कार्पेटवर अनोखा अंदाज पाहायला मिळाला. तर अभिनेता ॲडम सँडलरने बास्केटबॉल शॉर्ट्स आणि निळ्या रंगाची हुडी परिधान करून आला होता. त्याचा हा अवतार पाहून सर्वजण हैराण झाले. गैल गैडोट ऑफ-शोल्डर लाल गाउनमध्ये खूप सुंदर दिसली. 'एमिलिया पेरेज' स्टार जो सलदानाने मरुन रंगाच्या बलून ड्रेसमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सेलेना गोमेझ तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लँकोसोबत रेड कार्पेटवर पाहायला मिळाली. ब्रेटमॅन रॉकने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एड्रियन ब्रॉडी-हॅली बेरीचं किस चर्चेत
एड्रियन ब्रॉडी आणि हॅली बेरी यांनी रेड कार्पेटवर २००३च्या ऑस्कर सोहळ्यात केलेली किस पुन्हा रिक्रिएट केली आहे.. 'द पियानिस्ट'मधील भूमिकेसाठी ब्रॉडीला २००३ ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार जिंकल्यानंतर ब्रॉडीने बेरीचे चुंबन घेतले, ज्यामुळे बेरी आणि प्रेक्षक अवाक् झाले होते. आज त्याने हा क्षण पुन्हा रिक्रिएट केला.