निकोलला मुलाच्या जन्माअगोदर करायचेय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:07 IST2016-10-17T17:07:25+5:302016-10-17T17:07:25+5:30

गायिका निकोल शेरजिंगर हिने एक अजब इच्छा व्यक्त  केली आहे. मुलाला जन्म देण्याअगोदर तिला लग्न करायचे आहे. ख्रिश्चन मूल्यांवर ...

Nicola is married to a baby before birth | निकोलला मुलाच्या जन्माअगोदर करायचेय लग्न

निकोलला मुलाच्या जन्माअगोदर करायचेय लग्न

यिका निकोल शेरजिंगर हिने एक अजब इच्छा व्यक्त  केली आहे. मुलाला जन्म देण्याअगोदर तिला लग्न करायचे आहे. ख्रिश्चन मूल्यांवर प्रचंड विश्वास असल्यानेच तिने ही इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. 
३८ वर्षीय निकोल सध्या ‘एक्स फॅक्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘जज’च्या भूमिकेत आहे. सध्या ती टेनिस खेळाडू ग्रिगोर दिमिट्रोव याला डेट करीत आहे. निकोलने सांगितले की, मी माझ्या आयुष्याचा निर्णय चांगल्या रिलेशनशिपच्या आधारे घेवू इच्छिते. त्यासाठी अगोदर मी माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधत आहे. त्यानंतरच मुलाचा विचार करेन. मात्र हे सर्व योग्य वेळेनुसार व्हायला हवे. गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले होते. आता मात्र मी विवाहाचा विचार करीत आहे. 
दरम्यान निकोल यापूर्वी फार्मुला वन रेसर ड्रायव्हर लुइस हेमिल्टन याला डेट करीत होती. तब्बल आठ वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये राहिले. पुढे फेब्रुवारी २०१५ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. 

Web Title: Nicola is married to a baby before birth