Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:43 PM2024-05-07T14:43:41+5:302024-05-07T14:44:40+5:30

ईशा अंबानी हिनं Met Gala 2024 साठी खूपच सुंदर पेहराव केला.

Met Gala 2024 : It took Rahul Mishra 10,000 hours to make Isha Ambani's Met Gala look | Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन

Met Gala 2024 : ईशा अंबानीचा जलवा! 10 हजार तासांत तयार झाला तिचा खास फ्लोरल साडी गाऊन

बहुप्रतीक्षित Met Gala 2024 या फॅशन जगतातील मोठ्या फेस्टिव्हलला दणक्यात सुरुवात झाली. यावेळीही अनेक सेलिब्रिटीजच्या हटके लूकने सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि काही सेलिब्रिटीजच्या लूकची चर्चा आता सगळीकडे रंगली आहे . यंदाच्या मेट गाला फेस्टिव्हलमध्ये ईशा अंबानी (Isha Ambani) सहभागी झालीये आणि स्टायलिश लूकने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. Met Gala 2024 साठी तिने खूपच सुंदर पेहराव केला.

Met Gala 2024 मध्ये, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकीनं फ्लोरल साडी गाऊन परिधान केला. ईशाने भारतीय फॅशन डिझायनर राहुल मिश्रा आणि अनिता श्रॉफ अदजानियाने डिझाइन केलेला हा साडी गाऊन थीम 'द गार्डन ऑफ टाइम'वर आधारित आहे. ईशा अंबानीचा हा साडी गाऊन तयार होण्यासाठी 10 हजार तास लागले आहेत. 

 राहुल मिश्राने ईशाचे खास फोटो शेअर केले आहेत आणि फ्लोरल साडी गाऊनची खासियत सांगितली आहे. ईशा अंबानीचा हा संपूर्ण साडी गाऊन एम्ब्रॉयडरी आणि फुलांनी सजवलेला आहे. भारतीय कारागिरांनी स्वतःच्या हातांनी फ्लोरल साडी गाऊन तयार केला आहे. यावर फरीशा, जरदोरी, नक्षी आणि दब्का भरतकाम केलेलं आहे. ईशाने स्टेटमेंट ज्वेलरी आणि क्लासिक हेअरस्टाइल करून तिचा लूक पूर्ण केला आहे. तिच्या या लूकची जगभरात चर्चा होत आहे.

ईशा अंबनीच्या या साडी गाऊनला एक लांब ट्रेल जोडलेला आहे, जो तिच्या लूकमध्ये भर घालत आहे. यासोबतच ईशाने एक जेड क्लच बॅग कॅरी केली आहे. या बॅगवर जयपूरचे कारागीर हरी नारायण मारोटिया यांनी बनवलेले एक छोटेसे पेंटिंग आहे. यासोबतच राष्ट्रीय पक्षी मोरही आहे. सध्या सोशल मीडियावर ईशाच्या लूकचं कौतुक होत असून अनेकांनी कमेंट्स करत ती सुंदर दिसत असल्याचं म्हंटलं. ईशाचा लुक सगळ्यांना आवडला असून ती खुप सुंदर दिसत असल्याचं अनेकांनी म्हंटलं आहे.
 

Web Title: Met Gala 2024 : It took Rahul Mishra 10,000 hours to make Isha Ambani's Met Gala look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.