मेरियन कॉटिलार्डची ब्रॅड पिटवर स्तुती सुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 12:19 IST2016-11-15T12:15:16+5:302016-11-15T12:19:16+5:30

हॉलीवूड हॉट कपल ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली वेगळे होण्यामागे जिचे नाव घेतले जाते त्या मेरियन कॉटिलार्डने एका मुलाखतीमध्ये ...

Marion Cottillard praises Brad Pitt | मेरियन कॉटिलार्डची ब्रॅड पिटवर स्तुती सुमने

मेरियन कॉटिलार्डची ब्रॅड पिटवर स्तुती सुमने

लीवूड हॉट कपल ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली वेगळे होण्यामागे जिचे नाव घेतले जाते त्या मेरियन कॉटिलार्डने एका मुलाखतीमध्ये ब्रॅडवर कौतुकाचा वर्षाव केला. ब्रँजेलिनाने वेगळे होणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर मेरियनचे नाव चर्चेत आले होते.

ब्रॅड आणि मेरियन ‘अ‍ॅलाईड’ नावाच्या सिनेमात एकत्र दिसणार असून शूटींग दरम्यान त्यांच्यामध्ये वाढणाऱ्या सलगीमुळे अँजेलिनाने घटस्फोट घेण्याचे ठरविले असे सांगण्यात येते. मेरियनने अद्याप या विषयावर गप्प राहणेच पसंत केले होते. मात्र नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने ब्रॅडला जगातील सर्वात चांगला पुरुष म्हटले.

ती म्हणाली, ‘ब्रॅड खूप चांगला व्यक्ती आहे. तो एक उत्तम अभिनेता तर आहेच; पण एक मित्र म्हणूनही तो खूप चांगला आहे. म्हणून तर त्याच्यासोबत काम करताना एवढी मजा येते. समोरच्या कलाकाराला तो अत्यंत कम्फर्टेबल करतो. स्टारपणाचा कुठलाच बडेजाव तो दिसू अथवा भासवू देत नाही.’


अ‍ॅलाईड :  मेरियन कॉटिलार्ड आणि ब्रॅड पिट

मेरियनच्या तोंडून एवढे कौतुक ऐकून अँजेलिनाच्या तळपायातील आग मस्तकात गेली असणार. मीडिया गॉसिपनुसार, दोघांचे अफेयर सुरू असून याची भनक अँजेलिनाला लागली होती. यावरून त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत असत. मेरियन किंवा ब्रॅड दोघांनीही याविषयी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यानच्या काळात ब्रॅडवर मोठा मुलगा मॅडॉक्सला दारूच्या नशेत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. लॉस एंजिलिसच्या बालविभागाने सखोल चौकशी अंती ब्रॅडला निर्दोष ठरवले. याविषयीसुद्धा मेरियनने त्याची बाजू घेत तो असे कधीच करू शकत नाही हे ठासून सांगितले.


ब्रँजेलिना : ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली 

cnxoldfiles/a> सामावेश आहे.

Web Title: Marion Cottillard praises Brad Pitt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.