हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी किम कार्दिशियन या फोटोमुळे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 15:32 IST2020-05-06T15:23:39+5:302020-05-06T15:32:16+5:30
किमला तिच्या लूकसोबत नेहमीच एक्सपेरिमेंट करताना दिसते.

हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी किम कार्दिशियन या फोटोमुळे झाली ट्रोल
हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दिशियन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. दररोज ती तिचे बोल्ड फोटोज इन्स्टावर शेअर करते आणि चर्चेचा विषय ठरते. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग ते हटके लूक करतात तर कधी फोटोशूट. हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. किमला तिच्या लूकसोबत नेहमीच एक्सपेरिमेंट करताना दिसते.
किमने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती ट्रोल झाली आहे. किमने स्नेक प्रिंट लूकमधील आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. किमच्या फॅन्सनी असे काही नोटीस केले आहे ज्यामुळे तिला ट्रोल केले आहे.
You left an extra hand in your hair 😐 pic.twitter.com/EmXCNpPmQ1
— Ferris Wheel 🎡 (@NicolaFerris) May 4, 2020
फॅन्सना किमने शेअर केलेला फोटो हा फोटोशॉपच्या माध्यमातून एडिट केल्याचे समजले आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
THE NAILS IN HER HAIR LMFAO PHOTOSHOP IS HER PASSION✨😭 pic.twitter.com/ImI5ejXh0D
— Alex (@blankspacebabyd) May 4, 2020