किम कर्दाशियन घेणार कान्ये वेस्टकडून घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 22:25 IST2016-12-28T22:21:16+5:302016-12-28T22:25:50+5:30

गेल्या काही दिवसांपासून रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन आणि रॅपर कान्ये वेस्ट यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला असून, ...

Kim Kardashian to get divorce from Kanye West? | किम कर्दाशियन घेणार कान्ये वेस्टकडून घटस्फोट?

किम कर्दाशियन घेणार कान्ये वेस्टकडून घटस्फोट?

ल्या काही दिवसांपासून रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन आणि रॅपर कान्ये वेस्ट यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला असून, लवकरच ते एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांना कान्ये वेस्ट यांनी पूर्णविराम दिला असून, आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचे त्याने सांगितले आहे. 



डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार किमने कान्येला तिच्या आईने दिलेल्या ख्रिसमस पार्टीपासून दूर राहण्यास सांगितले होते. किम या पार्टीत तिच्या बहिणींसोबत लग्नाची अंगुठी न घालताच सहभागी झाली होती. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा तर निर्माण झाला नाही ना? असा अंदाज वर्तविला जात होता. त्यातच किम आणि कान्ये लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्याने दोघांच्या वैवाहिक जीवनावर याचा स्पष्टपणे प्रभाव पडत असताना दिसत होते. अखेर कान्येने यासर्व अफवांना पूर्णविराम देत अफवांचे खंडण केले आहे.



त्याचबरोबर किमच्या प्रवक्त्यानेही या अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ख्रिसमस पार्टीत कान्ये सुद्धा सहभागी झाला होता, असेही त्याने सांगितले. तर एका वृत्तपत्राने असा दावा केला की, प्रत्येक पार्टीत दोघेही एकत्र जात असतात, मग ख्रिसमस पार्टीत दोघे का एकत्र दिसले नाहीत? किमनेच कान्येसोबत पार्टीत जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे कान्ये पार्टीत सहभागी न होता, त्याच्या मित्रांसोबत फिल्म बघायला निघून गेला होता. तर किम तिच्या बहिणींसमवेत पार्टीत सहभागी झाली होती. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही गेल्या शुक्रवारी मुलगी नर्थ हिच्यासोबत ‘द नटक्रॅकर’ बघायला गेले होते; मात्र मोठ्या मुश्कीलने दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधला. दोघांमधील संबंध पूर्वीसारखे राहिले नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. दोघांना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लॉस एंजेलिस येथे बॅलेट कंपनीच्या ‘द नटक्रॅकर’च्या प्रदर्शनादरम्यान बघण्यात आले होते. 
दोघांच्या वैवाहिक आयुष्याविषयी ही अफवा होती की आणखी काय? हे जरी गुलदस्त्यात असले तरी त्यांच्या चाहत्यांची दोघांनी एकत्र राहावे हीच अपेक्षा असेल.

Web Title: Kim Kardashian to get divorce from Kanye West?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.