जॉन सीनाच्या न्यूड लूकचं सत्य आलं समोर; प्रत्यक्षात सुपरस्टारने घातले होते कपडे, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:00 IST2024-03-12T16:59:39+5:302024-03-12T17:00:52+5:30

John cena: सध्या सोशल मीडियावर जॉन सीनाचा ऑस्करच्या स्टेजबाहेरील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो खरोखर न्यूड नसल्याचं दिसून येत आहे.

john-cena-naked-on-stage-at-the-2024-oscars-now-wwe-wrestler-backstage-photo-goes | जॉन सीनाच्या न्यूड लूकचं सत्य आलं समोर; प्रत्यक्षात सुपरस्टारने घातले होते कपडे, हा घ्या पुरावा

जॉन सीनाच्या न्यूड लूकचं सत्य आलं समोर; प्रत्यक्षात सुपरस्टारने घातले होते कपडे, हा घ्या पुरावा

यंदा पार पडलेला 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. यात खासकरुन जॉन सीनाच्या (john cena) न्यूड लूकची सर्वत्र चर्चा झाली.  जॉन सीना ऑस्करच्या मंचावर चक्क न्यूड होऊन आला होता. ज्यामुळे उपस्थित सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नाही तर जागतिक स्तरावर त्याच्या या लूकची चर्चा झाली. मात्र, आता त्याच्या न्यूड लूकचं सत्य समोर आलं आहे. जॉन सीना खरोखरच नग्नावस्थेत मंचावर आला नसून त्याने कपडे परिधान केले होते.

सध्या सोशल मीडियावर जॉन सीनाचा ऑस्करच्या स्टेजबाहेरील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो खरोखर न्यूड नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्याने फक्त कार्यक्रमाची रंगत वाढावी आणि काही तरी ट्विस्ट यावा यासाठी हा स्टंट केल्याचं समोर आलं आहे.

खरोखर न्यूड लूकमध्ये आला होता का जॉन सीना?

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जॉन सीना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार देण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्याचा हा लूक पाहून सगळेच थक्क झाले होते. परंतु, त्याने हा लूक करत सिनेमामध्ये कपड्यांचं किती महत्त्व आहे हे अधोरेखित करायचा प्रयत्न केला.

जॉनने परिधान केले होते कपडे

जॉन सीनाच्या या लूकचं सत्य काही औरच आहे. मंचावरुन जॉन बाहेर गेल्यानंतर त्याचा स्टेजमागील एक फोटो समोर आला आहे. ज्यात तो नेक्ड नसल्याचं समोर आलं आहे. जॉन पूर्णपणे नेक्ड नव्हता त्याने स्कीन टोनची लंगोट परिधान केली होती. त्यामुळे जॉन खरोखरच न्यूड लूकमध्ये मंचावर आला नव्हता हे त्याचं सत्य आता समोर आलं आहे.

Web Title: john-cena-naked-on-stage-at-the-2024-oscars-now-wwe-wrestler-backstage-photo-goes