​जेनिफर लॉरेन्सला वाटतो ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीचा हेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:14 IST2016-12-31T17:14:58+5:302016-12-31T17:14:58+5:30

जगातील सर्वाधिक कमाई करणारी हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने फार कमी वयात खूप काही मिळवले आहे. दिसायला सुंदर, तरुण, यशस्वी ...

Jennifer Lawrence sees 'the actors' wife's jealousy | ​जेनिफर लॉरेन्सला वाटतो ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीचा हेवा

​जेनिफर लॉरेन्सला वाटतो ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीचा हेवा

ातील सर्वाधिक कमाई करणारी हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने फार कमी वयात खूप काही मिळवले आहे. दिसायला सुंदर, तरुण, यशस्वी अशा जेनिफरला कोणत्या गोष्टीची कमी असेल की तिला कुणाचा हेवा वाटावा?

पण एक गोष्ट अशी आहे ज्यामुळे तिला खूप हेवा वाटतो. ती गोष्ट म्हणजे क्रिस प्रॅट आणि त्याची पत्नी अ‍ॅना फेरिस यांचे निस्सिम प्रेम! ‘पॅसेंजर्स’ को-स्टार क्रिस आणि त्याच्या पत्नीमध्ये असणारे अतूट नाते पाहून तिला त्यांचा हेवा वाटतो, असे तिने सांगितले. 

चित्रपटाच्या सेटवर जेव्हा अ‍ॅना आणि त्यांचा मुलगा जॅक यायचे तेव्हा जेनिफर त्यांच्यासोबत खूप धमाल करायची. ती म्हणते, ‘क्रिसचे कुटुंब खूपच क्युट आहे! त्याचा मुलगा तर एकदम हुशार आहे. अ‍ॅना आणि माझी चांगलीच गट्टी जमली. ती अत्यंत प्रेमळ, समजुतदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलखुलासपणे आनंद लुटणारी आहे. तिची आणि क्रिसची केमिस्ट्री अगदी  प्रेमकथेप्रमाणे आहे. त्यांना एकत्र पाहिल्यावर लगेच लक्षात येते की, ते एकमेकांच्या प्रेमांत किती आकांत बुडालेले आहेत. मला तर त्यांचा खूप हेवा वाटतो.’

Anna Faris kissing Chris Pratt
किसिंग कपल :अ‍ॅना फेरिस आणि क्रिस प्रॅट

अशी गोष्ट नाही की, जेनिफरच्या आयुष्यात प्रेम नाही. सध्या ती दिग्दर्शक डेरेन अ‍ॅरोनोफस्कीला डेट करीत असल्याची चर्चा आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर त्यांना किस करताना पाहण्यात आले आहे. डॅरेनच्या वडिलांची तब्येत बिघडल्यावर तिने त्यांची खूप काळजी घेतली होती; परंतु दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

वयाच्या केवळ २३व्या वर्षी ‘सिल्वर लाईनिंग्स प्लेबुक’मधील मुख्य भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आॅस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘हंगर गेम्स’सारखी सुपरहीट फिल्म सिरीजही तिने केलेली आहे. येत्या ६ जानेवारीला तिचा ‘पॅसेंजर्स’ हा सिनेमा भारतात हिंदी, इंग्रजी,तमिळ आणि तेलुगू या चार भाषांत ३-डीमध्ये रिलीज होत आहे..

Web Title: Jennifer Lawrence sees 'the actors' wife's jealousy