जनवरी जोन्स म्हणतेय, मला जोडीदाराची गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 21:34 IST2017-01-05T21:34:15+5:302017-01-05T21:34:15+5:30
हॉलिवूड सेलिब्रेटी जोडीदारांशिवाय राहूच शकत नाहीत, असे जर म्हटले तर वावगे ठरू नये. कारण एखाद्याचे ब्रेकअप झाल्याच काही दिवसांत ...

जनवरी जोन्स म्हणतेय, मला जोडीदाराची गरज नाही
ह लिवूड सेलिब्रेटी जोडीदारांशिवाय राहूच शकत नाहीत, असे जर म्हटले तर वावगे ठरू नये. कारण एखाद्याचे ब्रेकअप झाल्याच काही दिवसांत त्या सेलिब्रेटीची इतराशी पॅचअप होते. शिवाय यामुळे माध्यमांमध्ये चर्चा होते ती वेगळीच. मात्र यास अभिनेत्री जनवरी जोन्स अपवाद आहे. तिच्या मते, तिला जोडीदाराची गरज नाही.
पीपूल डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ‘रेड’ या साप्ताहिकाशी सिंगल पॅरेंटिंग या विषयावर बोलताना जोन्स म्हणाली की, मला कधीच जोडीदाराची कमतरता जाणवली नाही. मीच काय तर माझा मुलगा जेंडर यालादेखील वडिलांची कमतरता भासली नाही.
पुढे बोलताना जोन्स म्हणाली की, जेंडर आमच्या शेजाºयांकडे तसेच माझ्या आई-वडिलांकडे खूपच मिळून मिसळून वागतो. एका पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर महिला असायला हवी. जेणेकरून त्याला महिलांचा सन्मान कसा राखता येईल, याची समजूत मिळावी, हेच मी माझ्या मुलाबाबत करीत आहे.
माझ्या मुलाच्या आजूबाजूला एकही पुरुष नाही. जो त्याला म्हणू शकेल की, ‘रडू नकोस किंवा तू मुलींसारखे नखरे करतो’ शक्यतो वडीलच मुलांना कळत-नकळत असे मूर्खासारखे बोलत असतात. त्याचे आयुष्य एका खंबीर महिलेच्या सहवासात व्यतित होत आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तो एक यशस्वी पुरुष म्हणून नावारूपास येईल.
त्याचबरोबर माझ्या आयुष्यातही कोणी पुरुष नसून, मला कधीच जोडीदाराची कमतरता भासली नाही. मात्र असे सांगत असताना जोन्सने हेही स्पष्ट केले की, तिचा हा विचार कायमस्वरूपी नाही. तर भविष्यात मला जोडीदाराच्या जाणीव झाल्यास मी नक्कीच विचार करणार. मात्र मी या कारणामुळे दु:खी किंवा एकटेपणा भासत असल्याचे मला अजिबात जाणवत नाही. जेव्हा असे जाणवेल तेव्हा मी असा जोडीदार निवडणे पसंत करेल जो माझ्या आनंदात सहभागी होऊन, मला सदैव खूश ठेवेल, असेही जोन्स म्हणाली.