जेम्स बॉण्डचा चित्रपट 'नो टाइम टू डाय' महाराष्ट्रातील थिएटरमध्ये या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 18:35 IST2021-10-21T18:35:37+5:302021-10-21T18:35:54+5:30
'नो टाइम टू डाय' चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होतो आहे.

जेम्स बॉण्डचा चित्रपट 'नो टाइम टू डाय' महाराष्ट्रातील थिएटरमध्ये या दिवशी येणार भेटीला
जेम्स बॉण्डचा चित्रपट 'नो टाइम टू डाय' अखेर मागील महिन्यामध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. जगभरातील प्रेक्षकांनी प्रेमळ फ्रेंचायझीच्या २५व्या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटाने भारतातील हॉलिवुड चित्रपटांसाठी नवीन बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् स्थापित केले, तसेच समीक्षक देखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत आणि फ्रेंचायझी डॅनियल क्रेगचा बेस्ट फेअरवेल असा सर्वोत्तम चित्रपट असल्याचे मानत आहेत. महाराष्ट्रातील चित्रपट प्रेमींसाठी अखेर प्रतिक्षा काळ संपला आहे, कारण चित्रपट २२ ऑक्टोबर रोजी राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्धी व उत्साहपूर्ण मनोरंजनाशी बांधील राहत चित्रपट 'नो टाइम टू डाय'ने लक्षवेधक कथानक व प्रखर कथेसह यंदा देशातील हॉलिवूड चित्रपटांसाठी सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् मोडून काढले.
चित्रपटाचे दिग्दर्शक कॅरी फुकुनगाबाबत बोलताना डॅनियल क्रेग म्हणाले, ''आम्ही डॅनी बॉयल यांच्यासोबत चर्चा केली, जे अनेक चित्रपटांच्या बाबतीत घडले आहे. बॉण्ड अभिनीत चित्रपट नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहेत. ही प्रथा कायम व प्रशंसनीय होती. कॅरी उपलब्ध होते आणि बॉण्ड चित्रपट बनवण्यापूर्वी बार्बेरासोबत चर्चा करावी लागली. ते दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांची व्हिज्युअल शैली अत्यंत प्रबळ आहे. बॉण्ड चित्रपट बनवण्यासाठी यासारख्याच क्षमतापूर्ण व्यक्तीची गरज असते. ही मोठी डिल आहे. प्रबळ चित्रपटनिर्मिती शैली व चित्रपट निर्माण करण्याबाबत माहिती असलेली व्यक्ती महत्त्वाची असते, कारण कथानकामध्ये सातत्यता राखावी लागते, तसेच त्यामधून योग्य लुक्स व हावभाव देखील दाखवावे लागतात. प्रेक्षक कधीच बोलत नाही की 'थांबा, काय चालू आहे?' कॅरी हा तरूण आहे आणि त्याच्यामध्ये खूप स्टॅमिना आहे. शूटिंगला सात महिने उलटले आहेत, तरीदेखील त्याचा उत्साह तसाच आहे. त्याची सोबत लाभणे हे आमचे नशीब आहे. तसेच तो लेखक देखील आहे, जे आमच्यासाठी महत्त्वाचे होते, कारण आम्ही अशा टप्प्यावर होतो, जेथे पटकथा लेखनासंदर्भात वेळ निघून जात होती.'' हा चित्रपट २२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होतो आहे.