बजेटपेक्षा ९ पटींनी कमाई करणारा हॉरर चित्रपट! बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; एकट्यात पाहाल तर उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:38 IST2025-11-17T19:32:24+5:302025-11-17T19:38:08+5:30

२ तास १५ मिनिटांचा हॉरर सिनेमा, एकट्यात पाहण्याची हिंमतही करु नका नाहीतर...

horror film conjuring the last rites earned 3140 crore in worldwide only 16 days must watch it  | बजेटपेक्षा ९ पटींनी कमाई करणारा हॉरर चित्रपट! बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; एकट्यात पाहाल तर उडेल झोप

बजेटपेक्षा ९ पटींनी कमाई करणारा हॉरर चित्रपट! बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; एकट्यात पाहाल तर उडेल झोप

Hollywood Movies: आजकाल प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची कमालीची क्रेझ आहे. क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांप्रमाणेच हल्ली सिनेरसिकांचा कल हॉरर चित्रपटांकडे वाढला आहे. शिवाय अलिकडेच निर्माते या जॉनरच्या चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहेत. जेव्हा कधी हॉरर चित्रपटांची चर्चा होते, सर्वात आधी हॉलिवूड चित्रपट 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' या चित्रपटाचं नाव डोळ्यासमोर येतं.अलिकडेच या वर्षाच्या सुरुवातीला 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स'  चित्रपटाचा नववा भाग प्रदर्शित झाला.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. 

५ सप्टेंबर २०२५ ला रिलीज झालेला 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' हा एक अमेरिकन हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट 'द कॉन्ज्युरिंग' युनिव्हर्समधील नववा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मायकल चाव्स यांनी केलं आहे तर, इयान गोल्डबर्ज आणि रिचर्ड नेइंहग आणि डेव्हिड लेस्सी जॉनसन यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. पॅट्रिक विल्सन, वेरा फार्मिगा, मिया टॉमलिन्सन आणि बेन हार्डी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  अवघ्या १६ दिवसांमध्ये या २ तास १५ मिनिटांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ९ पटींनी जास्त कमाई केली. या चित्रपटाने अवघ्या १६ दिवसांत ३१४० कोटींची कमाई केली होती. तर भारतात ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' या चित्रपटात एड आणि लॉरेन वॉरेन्स पुन्हा एकदा सैतानी शक्तींना सामोरे जाताना दिसत आहेत. या चित्रपटाची कहाणी स्मुल कुटुंबामध्ये घडणार्‍या घटनांवर आधारित आहे.  एड आणि लॉरेन वॉरेन्स या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुढे येतात आणि या रहस्याचा उलगडा करतात. जर तुम्ही रात्री चुकून हॉरर चित्रपट पाहिला, तर भीतीमुळे तुम्हाला साधी झोपही येत नाही.

Web Title : हॉरर फिल्म ने बजट से 9 गुना कमाया, बॉक्स ऑफिस पर धमाल!

Web Summary : हॉरर फिल्म 'द कंज्यूरिंग: लास्ट राइट्स' ने 16 दिनों में विश्व स्तर पर अपने बजट से 9 गुना अधिक कमाई की। फिल्म में एड और लोरेन वॉरेन राक्षसी ताकतों का सामना करते हैं।

Web Title : Horror film earns 9 times budget, box office success!

Web Summary : The Conjuring: Last Rites, a horror film, grossed 9 times its budget globally in 16 days. The film follows Ed and Lorraine Warren as they confront demonic forces.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.