कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' गाण्यावर थिरकली हॉलिवूड अभिनेत्री, डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:13 IST2026-03-09T13:12:08+5:302026-03-09T13:13:35+5:30
हॉलिवूड अभिनेत्रीला कतरिनाच्या आयटम साँगची भुरळ पडली आहे. या अभिनेत्रीने कतरिनाच्या गाण्यावर ठेका धरत व्हिडीओ शेअर केला आहे.

कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' गाण्यावर थिरकली हॉलिवूड अभिनेत्री, डान्स व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने चिकनी चमेलीपासून 'शिला की जवानी'पर्यंत अनेक आयटम साँग बॉलिवूडला दिले आहेत. तिचे सगळेच आयटम साँग हिट ठरले. यातील काही आयटम साँग हे आजही पार्टीमध्ये वाजवले जातात. अनेक इव्हेंटमध्ये कतरिनाच्या या गाण्यांवर चाहते थिरकताना दिसतात. आता चक्क हॉलिवूड अभिनेत्रीला कतरिनाच्या आयटम साँगची भुरळ पडली आहे. या अभिनेत्रीने कतरिनाच्या गाण्यावर ठेका धरत व्हिडीओ शेअर केला आहे.
जुमांजी फेम हॉलिवूड अभिनेत्री कैरेन गिलन हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कैरेन कतरिनच्या 'शिला की जवानी' गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. कैरेनचे डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. कैरेनला कतरिनाच्या या गाण्याचं वेड लागलं आहे. तिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "मी आज पाहिलेला सगळ्यात कुलेस्ट व्हिडीओ आहे हा", "कैरेन गिलनने शिला की जवानीवर डान्स केला", असं कमेंटमध्ये काहींनी म्हटलं आहे.
OMGGGGG???? katrina you icon!!! pic.twitter.com/SjHX9sUMHc
— m 🕵🏻♀️ (@reallymims) March 6, 2026
कतरिना कैफचं 'शिला की जवानी' हे गाणं तीस मार खान या सिनेमातील आहे. २०१० मध्ये हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. 'शिला की जवानी' या गाण्यात कतरिनाने डान्स केला होता. तिची हुक स्टेप प्रचंड व्हायरल झाली होती. सुनिधि चौहान आणि विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर फराह खानने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं. या सिनेमात अक्षय कुमार, कतरिना कैफ, अक्षय खन्ना, अपरा मेहता, अली असगर, रघु राम अशी स्टारकास्ट होती.