धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:40 IST2026-02-27T10:39:40+5:302026-02-27T10:40:17+5:30
हॉलिवूड विश्वातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने आत्महत्या केली आहे.

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ४२ वर्षीय लेकीची आत्महत्या, गोळी झाडून स्वत:ला संपवलं, घरात आढळला मृतदेह
हॉलिवूड विश्वातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या लेकीने आत्महत्या केली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते मार्टिन शॉर्ट यांची मोठी मुलगी कॅथरीन शॉर्ट हिने गोळी झाडत स्वत:ला संपवलं. ती ४२ वर्षांची होती. लॉस एंजलिस येथील राहत्या घरात तिचा मृतदेह आढळला. तिच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबीयांकडून कॅथरीनच्या मृत्यूची बातमी देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी(२३ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास ही दु:खद घटना घडली. लॉस एंजलिस येथील राहत्या घरात कॅथरीनने स्वत:ला गोळी झाडत संपवलं. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते कॅथरीनच्या हॉलिवूड हिल्स येथील घरी पोहोचले. तिथे कॅथरीन त्यांना मृतावस्थेत आढळली. याबाबत अधिक चौकशी पोलीस करत आहेत. कॅथरीनच्या निधनाच्या धक्क्यातून मार्टिन शॉर्ट स्वत:ला सावरू शकत नाहीयेत. "कॅथरीनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. शॉर्ट कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कॅथरीन सर्वांना प्रिय होती आणि तिने या जगात आणलेल्या आनंदी भावनेसाठी ती नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या कठीण काळात तुम्ही सर्वांनी गोपनीयता राखावी, कुटुंबाला सावरण्यासाठी वेळ द्यावा", अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
कॅथरीन शॉर्ट ही मार्टिन यांची सगळ्यात मोठी मुलगी होती. त्यांची दिवंगत पत्नी नॅन्सी डोलमन यांच्यापासून कॅथरीन ही मुलगी झाली होती. वडील सुप्रसिद्ध अभिनेते असूनही कॅथरीनने लाइमलाइटपासून नेहमी दूरच राहणं पसंत केलं. ती समाजसेवेत कार्यरत होती. ती मानसिक आरोग्याच्या संबंधित काम करत होती. त्यामुळे कॅथरीनच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.