हॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचं ८६व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:45 IST2026-03-21T13:45:18+5:302026-03-21T13:45:54+5:30

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्ट्सचे बादशहा चक नॉरिस यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते.

hollywood actor martial artist chuck norris passed away at the age of 86 | हॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचं ८६व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचं ८६व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि मार्शल आर्ट्सचे बादशहा चक नॉरिस यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. चक नॉरिस यांच्या कुटुंबीयांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. १९ मार्च रोजी चक यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली असून चाहते आणि सेलिब्रिटीही शोक व्यक्त करताना दिसत आहेत. 

चक नॉरिस यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. "अत्यंत दु:खाने, आमच्या लाडक्या चक नॉरिस यांच्या  आकस्मिक निधनाची बातमी देत आहोत. आम्ही  ही बातमी खासगी ठेवणार होतो. शेवटच्या क्षणी ते कुटुंबासोबत होते. शांतीने आमच्या आयुष्यातून निघून गेले. जगासाठी ते एक महान  मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता होते.  पण आमच्यासाठी ते एक चांगले पती, मुला बाळांवर प्रेम करणारे वडील,  भाऊ आणि आमच्या कुटुंबाचे ह्रदय होते. त्यांनी आपले  पूर्ण आयुष्य श्रद्धा, ध्येय आणि आपल्या प्रियजनांप्रती पूर्ण निष्ठेने जगले", असं म्हणत चक नॉरिस यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. 


चक नॉरिस यांचा जन्म १९४० साली झाला होता. अमेरिकेच्या वायू सेनेत त्यांनी काही वर्ष देशसेवा केली. त्यानंतर त्यांनी मार्शल आर्ट्समध्ये पाऊल ठेवलं. कराटे, ज्युदो, ब्राजीलियन जिऊ-जित्सु यामध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला होता. ब्रूस लीसोबत ऑन स्क्रीन फाइट सीन्समुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. 'लोन वुल्फ मॅकक्वेड', 'कोड ऑफ साइलेंस' आणि 'वेह ऑफ द ड्रॅगन' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 

Web Title : हॉलीवुड के एक्शन हीरो चक नॉरिस का 86 वर्ष की आयु में निधन

Web Summary : हॉलीवुड में चक नॉरिस, मार्शल आर्ट्स के दिग्गज और अभिनेता, का 86 वर्ष की आयु में निधन हो गया। 'वे ऑफ द ड्रैगन' जैसी फिल्मों और वायु सेना में सेवा के लिए जाने जाने वाले, उनके परिवार ने खबर साझा की, जिससे व्यापक शोक फैल गया।

Web Title : Hollywood Action Hero Chuck Norris Passes Away at 86

Web Summary : Hollywood mourns the loss of Chuck Norris, martial arts legend and actor, at 86. Known for films like 'Way of the Dragon' and service in the Air Force, his family shared the news, prompting widespread শোক.