या अभिनेत्रीने फक्त 48 तासांत कमावले 'इतके' कोटी, ऐकून विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 13:47 IST2021-11-06T13:43:16+5:302021-11-06T13:47:59+5:30
Sarah Jayne Dunn : सारा जेन डनच्या ऑन्लीफॅन्स (OnlyFans) अकाऊंटचे सब्सक्रायबर अवघ्या दोन दिवसांत दुपटीने वाढले आहेत. सारा जेन डन छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

या अभिनेत्रीने फक्त 48 तासांत कमावले 'इतके' कोटी, ऐकून विश्वास बसणार नाही
लंडन : ब्रिटीश अभिनेत्री सारा जेन डनने (Sarah Jayne Dunn) अवघ्या 48 तासांत 121,000 पौंड (जवळपास 1.5 कोटी रुपये) कमवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सारा जेन डनने तिचे काही हॉट फोटो शेअर करूनच हा बंपर कमाई केली आहे. तिच्या ऑन्लीफॅन्स (OnlyFans) अकाऊंटचे सब्सक्रायबर अवघ्या दोन दिवसांत दुपटीने वाढले आहेत. सारा जेन डन छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
'डेली स्टार'च्या बातमीनुसार, सारा जेन डनने याच आठवड्यात अॅक्टिंग इंडस्ट्रीला अलविदा करून अडल्ट इंडस्ट्रीत (Adult Industry) तिच्या करिअरला सुरुवात केली. या 40 वर्षीय अभिनेत्रीने ओन्लीफॅन्सवर तिचे काही हॉट फोटो शेअर करताच लोकांनी लाइक केले. काही तासांतच तिचे सब्सक्रायबर दुपटीने वाढले. फोटोवरील लाईक्सचा आकडाही लगेच गगनाला भिडला.
जेवढे सब्सक्रायबर तेवढी कमाई
4 नोव्हेंबर रोजी सारा जेन डनच्या पोस्टला 12,000 लाइक्स होते, जे 24 तासांत 23,000 झाले. दरम्यान, ओन्लीफॅन्सवर एखाद्याला फॉलो करण्यासाठी आणि त्याचे व्हिडिओ-फोटो पाहण्यासाठी, संबंधित व्यक्तीला सब्सक्राईब करावे लागते. यासाठी दर महिन्याला 11 पौंड फी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच जितके अधिक सब्सक्रायबर तितकी कमाई.
नव्या क्षेत्रात खुश आहे सारा जेन डन
सारा जेन डन तिच्या नव्या प्रवासात म्हणजेच अडल्ट इंडस्ट्रीत खूप खूश आहे. ती म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यातील बरीच वर्षे अभिनय क्षेत्रात घालवली, आता मला काहीतरी वेगळे करायचे आहे. त्यामुळे ओन्लीफॅन्सवर फोटो शेअर करणे सुरू केले आहे. लोकांना माझे फोटो खूप आवडतात, हे पाहून मला खूप चांगले वाटते.' दरम्यान, ओन्लीफॅन्सवर अकाऊंट तयार करणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढली आहे.