धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:37 IST2025-11-15T11:36:41+5:302025-11-15T11:37:25+5:30
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जंगल सफारीला गेलेल्या २९ वर्षीय फिल्म एडिटरचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जंगल सफारीला गेलेल्या २९ वर्षीय फिल्म एडिटरचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'ची एडिटर कॅथरीन चैपल हिच्यासोबत ही दुर्देवी घटना घडवी आहे. सिंहाच्या हल्ल्यात कॅथरीनला जीव गमवावा लागला आहे. सिंहाचा फोटो काढणं कॅथरीनला भारी पडलं आहे.
'मिरर.को.युके'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅथरीन जंगल सफारीला गेली होती. जमीनीवर झोपलेल्या सिंहाचा फोटो काढण्याचा मोह कॅथरीनला आवरता आला नाही. तिने कारची खिडकी खाली करत सिंहाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा समोर धरला. ज्या क्षणी कॅथरीनने फोटो क्लिक केला त्याच क्षणी सिंहाने खिडकीतून तिच्यावर हल्ला केला. सिंहाने पहिल्याच हल्ल्यात कॅथरीनच्या उजव्या खांद्याचा लचका तोडला. तर दुसऱ्यांदा तिच्या चेहऱ्यावर हल्ला केला. कॅथरीनला वाचवण्यासाठी तिच्या बॉडीगार्डने उडी घेत सिंहाला मुक्का मारला. पण, याचा काहीच उपयोग झाला नाही.
सिंहाचा हल्ला इतका जबरदस्त होता की या हल्ल्यात कॅथरीनचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. कॅथरीनच्या कुटुंबीयांकडून तिच्या मृत्यूनंतर भावुक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तिला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या बॉडीगार्डला या संपूर्ण घटनेनंतर हृदयविकाराचा झटका आला आहे. कॅथरीन ही स्पेशल इफेक्ट्स एडिटर होती. तिला एमी पुरस्कारही मिळाला होता. 'कॅप्टन अमेरिका', 'डायवर्जेंट' सारख्या सिनेमांसाठी तिने काम केलं होतं.