'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स' OTT वर होणार प्रदर्शित, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:47 IST2025-10-08T13:45:42+5:302025-10-08T13:47:30+5:30
जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही हा चित्रपट जरूर पाहावा.

'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स' OTT वर होणार प्रदर्शित, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Final Destination Bloodlines OTT Release: हॉलिवूडच्या गाजलेल्या थरारक सिनेमांपैकी एक म्हणजे 'फायनल डेस्टिनेशन' चित्रपटाची सीरिज. भारतातही 'फायनल डेस्टिनेशन' लोकप्रिय आहे. या प्रसिद्ध हॉरर चित्रपट सिरीजच्या सहावा भाग अलिकडेच 'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' (Final Destination: Bloodlines) थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येत आहे.
'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' हा १४ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत हा चित्रपट फ्रँचायझीतील सर्वाधिक कमाई करणारा भाग ठरला. 'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स'मध्ये केटलिन सांता जुआना, टियो ब्रायोनेस, रिचर्ड हार्मन, ओवेन पॅट्रिक जॉयनर, रिया किहल्स्टेड, ब्रेक बॅसिंगर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
कुठे पाहायला मिळणार?
'फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स' आता जिओ सिनेमा (JioCinema) वर प्रदर्शित होणार आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. येत्या १६ ऑक्टोबरपासून केवळ जिओ सिनेमावर हा चित्रपट पाहता येईल. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना त्यांच्या मातृभाषेत हा हॉरर अनुभव घेता येतोय.
मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेचा सातवा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फायनल डेस्टिनेशन' चित्रपटाचा कथानक इतर हॉरर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. यात कोणत्याही भुताखेतांचा धसका नाही, तर मृत्यूचा एक अनोखा आणि भीषण अनुभव दाखवण्यात येतो. चित्रपट पाहून बाहेर पडणारे प्रेक्षक वेगळाच थरार अनुभवत आहेत. Final Destination चा पहिला भाग २००० साली आला होता आणि पाचवा भाग २०११ साली. म्हणजे तब्बल १४ वर्षांनंतर 'फायनल डेस्टिनेशन' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.