घराला लागलेल्या आगीत प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, वयाच्या ६६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:31 IST2025-05-02T11:31:03+5:302025-05-02T11:31:13+5:30

वयाच्या ६६व्या वर्षी गायिकेचा घरात लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे समजते आहे.

Famous singer Jill Sobule dies in house fire, breathes her last at the age of 66 | घराला लागलेल्या आगीत प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, वयाच्या ६६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

घराला लागलेल्या आगीत प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, वयाच्या ६६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत जगतात आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हॉलिवूडची दिग्गज गायिका आणि गीतकार जिल सोबुले (Jill Sobule) यांनी १ मे रोजी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ६६व्या वर्षी जिल यांचा घरात लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे समजते आहे. त्या नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध गायिका होत्या, ज्यांना 'आई किस्ड अ गर्ल' या गाण्यातून लोकप्रियता मिळाली होती.  

जिल सोबुले या एक प्रसिद्ध हॉलिवूड गायिका होत्या ज्यांच्या आवाजाने जगभर जादू पसरवली होती. शुक्रवारी, त्या पुन्हा एकदा त्यांच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध करणार होत्या, पण त्याआधीच एक वाईट अपघात घडला ज्यामध्ये त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी मिनेसोटा येथील त्यांच्या घराला लागलेल्या आगीत गायिकेचा मृत्यू झाला.

गायिकेचा शुक्रवारी होता परफॉर्मन्स
जिल सोबुले यांचे व्यवस्थापक जॉन पोर्टर यांनी मिनेसोटा स्टार ट्रिब्यूनला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. गायिकेच्या वेबसाइटनुसार, जिल शुक्रवारी, २ मे रोजी त्यांच्या गावी डेन्व्हरमध्ये आत्मचरित्रात्मक स्टेज संगीतमय ७ व्या ग्रेडचे प्रदर्शन करण्यासाठी सादरीकरण करणार होत्या. २०२३ मध्ये ड्रामा डेस्क पुरस्कारासाठी त्या नामांकित झाल्या होत्या.


जिल सोबुले यांची कारकीर्द
जिल सोबुले ९० च्या दशकापासून संगीत क्षेत्रात सक्रीय आहेत आणि त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकत आहेत. त्यांना सर्वाधिक ओळख 'आय किस्ड अ गर्ल', 'क्लुलेस' आणि 'सुपरमॉडेल' या गाण्यांमधून मिळाली. १९९० मध्ये त्यांनी 'थिंग्ज हियर आर डिफरंट' हा पहिला अल्बम प्रदर्शित केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. जिल सोबुले त्यांच्या गायन शैलीसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांनी नेहमीच त्यांच्या गाण्यांमध्ये महिलांचे सक्षमीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व व्यक्त केले. 

Web Title: Famous singer Jill Sobule dies in house fire, breathes her last at the age of 66

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.