Corona Virus: कोरोना संक्रमित असूनही घरीच केले उपचार, अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:04 IST2020-03-27T18:03:15+5:302020-03-27T18:04:15+5:30
हे सगळी कोरोना संक्रमित असल्याची लक्षणं असल्याचेही तिने म्हटले होते. त्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक माहिती तिने सांगितली आहे.

Corona Virus: कोरोना संक्रमित असूनही घरीच केले उपचार, अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबतच नाहीय. या विषाणूने सामान्य लोकांपासून स्टार्सनाही भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त संख्येत वाढ होत असल्याचे चित्र जगात पाहायला मिळत आहे. यात अनेक हॉलिवूड स्टार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. यांत अनेकजणांचा मृत्यू झाल्याचेही समोर येत आहे. सगळीकडे भयावह परिस्थिती असताना एक अभिनेत्रीने मात्र कोणत्याही प्रकारचे उपचार न घेताच कोरोनावर मात केल्याचा खुलासा याच अभिनेत्रीने केला आहे.
ही अभिनेत्री आहे जेम्स बाँड अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्को. 15 मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आजाराची बातमी दिली होती. सुरूवातीला पहिल्या आठवड्यात तिला बरे वाटत नव्हते. त्यानतंर तीव्र ताप आणि डोकेदुखी व्हायला सुरूवात झाली. दुसर्या आठवड्यात ताप निघून गेला, तरीही एक सौम्य कफ होता आणि खूप थकवा देखील जाणवत असल्याचे तिने सांगितले होते. हे सगळी कोरोना संक्रमित असल्याची लक्षणं असल्याचेही तिने म्हटले होते. त्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक माहिती तिने सांगितली आहे.
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती रुग्णालयातही गेली नाही. कोरोना झाल्याचे कळताच तिने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले होते. योग्य ती खबरदारी घेतली आणि १४ दिवसानंतर कोरोनावर मात मिळवली असल्याचे तिचे म्हणणे आहे. इतकेच नव्हेतर ती आता चक्क तिच्या मुलांसोबत देखील वेळ घालवत असून पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
मात्र या अभिनेत्रीने कोरोना असूनही कोणतेही वैद्यकिय उपचार घेतलेच नाही यावर मात्र कोणाचाही विश्वास बसत नाही. आणि जरी तिने असे केले असेल तर तिन नियमाचे उल्लंघन केले आहे. कोरोना असूनही तिने उपचार घेतले कसे यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कोरोनाहा बरा होतो पण योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. सध्या या अभिनेत्रीवर सर्वच स्थरांवर टीकाही होत आहे.