अरे देवा!! या अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, स्वत: दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 11:14 IST2020-03-17T10:50:17+5:302020-03-17T11:14:40+5:30

कोराना व्हायरसने हजारोंचे बळी घेतले. लाखो लोकांना ग्रासले. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही.

british actor idris elba found positive for corona virus after tom hanks and olga kurylenko-ram | अरे देवा!! या अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, स्वत: दिली माहिती

अरे देवा!! या अभिनेत्यालाही कोरोनाची लागण, स्वत: दिली माहिती

कोराना व्हायरसने हजारोंचे बळी घेतले. लाखो लोकांना ग्रासले. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीही यातून सुटलेले नाही. हॉलिवूडमध्ये कोरोनाने ग्रासले आहे. काही दिवासांपूर्वी हॉलिवूडचे सुप्रसिदध अभिनेता टॉम हँक्स यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर ‘जेम्स बॉन्ड’ची अभिनेत्री   ओल्गा कुरीलेन्को  हिलाही कोरोनाची बाधा झाली. आता ब्रिटीश अभिनेता इडरिस एल्बा यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन याची माहिती चाहत्यांशी शेअर केली आहे.


एल्बाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आज सकाळी मी चाचणी केली आणि मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आत्तापर्यंत माझ्यात या आजाराची कुठलीही लक्षणे नाही. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मी आयसोलेट झालो आहे आणि एकांतात वेळ घालवतो आहे. मित्रांनो घरी राहा, सावध राहा. पॅनिक होऊ नका,’ असे त्याने या व्हिडीओतसोबत लिहिले आहे.
‘हे सगळे गंभीर प्रकरण आहे. अनेकांमध्ये लक्षणे नाहीत. पण ते व्हायरस पसरवत आहेत. एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याचे कळताच मी टेस्ट केली आणि मलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले,’ असे एल्बा व्हिडीओत म्हणतोय.
 
  

Web Title: british actor idris elba found positive for corona virus after tom hanks and olga kurylenko-ram