बेन इफ्लेक करतोय सिएना मिलरचे तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 21:43 IST2017-01-11T21:43:11+5:302017-01-11T21:43:11+5:30
अभिनेता तथा निर्माता बेन एफ्लेक सध्या त्याच्या ‘लाइव्ह बाय नाइट’ या सिनेमातील सहकलाकार सिएना मिलर हिचे गोडवे गाताना अजिबात ...

बेन इफ्लेक करतोय सिएना मिलरचे तोंडभरून कौतुक
अ िनेता तथा निर्माता बेन एफ्लेक सध्या त्याच्या ‘लाइव्ह बाय नाइट’ या सिनेमातील सहकलाकार सिएना मिलर हिचे गोडवे गाताना अजिबात थकत नाही. संधी मिळेल तेव्हा तो तिच्यावर स्तुतिसुमने उधळीत असतो. नुकतेच त्याने तिचे कौतुक करताना म्हटले की, सिएना मिलर हिच्यात जबरदस्त उत्साह असून, त्यामुळे तिच्या सिनेमांना एकप्रकारचा जादूचा स्पर्शच ती करून जाते.
![]()
बेन इफ्लेक आणि सिएना मिलर
वॉर्नर ब्रदर्स यांच्या या ‘लाइव्ह बाय नाइट’ या सिनेमात बेन एफ्लेक दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा भूमिकेत आहे. या सिनेमा भारतात १३ जानेवारी रोजी रिलिज केला जाणार आहे. सिनेमात एले फॅनिंग, ब्रेंडन ग्लिसन, क्रिस मेसीना, जो सॅल्डाना आणि क्रिस कूपर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सॅल्डाना हिच्याविषयी बोलताना एफ्लेकने म्हटले की, ती एक अनुभवी कलाकार आहे. ती जे भूमिका साकारते त्याला योग्य न्याय देते. कारण तिच्या वाटेला आलेल्या भूमिकेला ती पूर्णत: समर्पित होते. ती खूपच मेहनती कलाकार असून, सिनेमामध्ये ते प्रकर्षाने दिसून येते. लाइव्ह बाय नाइट या सिनेमात सर्वच कलाकारांनी जरबदस्त परफॉर्म केला असून, प्रेक्षकांना हा सिनेमा भावणार असा आशावादही बेन इफ्लेक याने व्यक्त केला.
![]()
लाइव्ह बाय नाइट सिनेमातील प्रसंग
त्याचबरोबर सिएना मिलर हिनेही बेन एफ्लेकवर स्तुतिसुमने उधळली आहेत. तिच्या मते तो एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता असून, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव मजेशीर असल्याचे तिने सांगितले.