SEE PICS : ही सुपरमॉडेल ठरली पृथ्वीवरची सर्वाधिक सुंदर महिला, आमचा नाही विज्ञानाचा आहे दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 14:08 IST2019-10-17T14:07:19+5:302019-10-17T14:08:04+5:30
सौंदर्याची कुठलीही अचूक व्याख्या नाही. प्रत्येकासाठी सौंदर्याचे निकष वेगवेगळे आहेत. पण तरिही विज्ञानाने सौंदर्याचे काही निकष बनवले आहेत आणि या निकषांनुसार,ही सुपरमॉडेल पृथ्वीवरची सर्वांत सुंदर महिला आहे.

SEE PICS : ही सुपरमॉडेल ठरली पृथ्वीवरची सर्वाधिक सुंदर महिला, आमचा नाही विज्ञानाचा आहे दावा
सौंदर्याची कुठलीही अचूक व्याख्या नाही. प्रत्येकासाठी सौंदर्याचे निकष वेगवेगळे आहेत. पण तरिही विज्ञानाने सौंदर्याचे काही निकष बनवले आहेत आणि या निकषांनुसार, अमेरिकेची सुपरमॉडल बेला हदीद मुलगी पृथ्वीवरची सर्वांत सुंदर महिला आहे. होय, बेला ही सुपरमॉडल आहे आणि जगभरात तिचे चाहते आहेत.
The Golden Ratio of Beauty Phi’ने निश्चित केलेल्या सौंदर्यांच्या मापदंडानुसार बेला हदीदची पृथ्वीवरची सर्वाधिक सुंदर महिला ठरलीआहे. ग्रीक मॅथेमॅटिक्टच्या आधारावर The Golden Ratio of Beauty Phi ने सौंदर्याचे काही मापदंड निश्चित केले आहे. शास्त्रीय आधारावर निश्चित करण्यात आलेल्या या मापदंडात बेली हदीदचा चेहरा अगदी फिट बसतो. The Golden Ratio of Beauty Phi ने निश्चित केलेल्या सौंदर्याच्या मापदंडावर बेली हदीदचा चेहरा 94.35 टक्के खरा उतरतो.
या आधारावर पॉप गायिका बियॉन्से दुस-या स्थानावर आहे. तिचा चेहरा 92.44 टक्के मिळतो.
अभिनेत्री अंबर हर्ड 91.85 टक्क्यांसह तिस-या स्थानावर आहे.
तर पॉप स्टार एरियाना ग्रांडे चौथ्या स्थानावर आहे.
लंडनच्या प्रतिष्ठित हार्ले स्ट्रिटचे लोकप्रिय फेशियल कॉस्मेटिक सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी सांगितल्यानुसार, शारिरीक रचना आणि चेहºयाची ठेवण, त्याचे शास्त्रीय माप या आधारावर बेला हदीद स्पष्ट विजेती आहे. तिच्या हनुवटीचे माप सर्वाधिक रेटींग मिळवणारा भाग आहे. ब्युटी स्टँडर्डनुसार तो 99.7 टक्के परफेक्ट आहे.
पाहा, पृथ्वीरची सर्वात सुंदर महिला ठरलेल्या बेला हदीदचे फोटो