‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ चित्रपट नाही, मास्टरपीस! सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:20 IST2019-04-26T10:11:42+5:302019-04-26T11:20:43+5:30

हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झालेत. मी कधीही सुपरहिरो चित्रपट पाहून रडलो नाही. पण ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ पाहताना माझ्या भावना मी रोखू शकलो नाही, असे एका युजरने लिहिले.

avengers endgame release india social media reaction get epic response | ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ चित्रपट नाही, मास्टरपीस! सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस!!

‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ चित्रपट नाही, मास्टरपीस! सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस!!

जगभरातील चाहते ज्या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तो चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला. आम्ही बोलतोय ते, हॉलिवूड चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’बद्दल. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेज पाहायला मिळाली. इतकी की, या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या अनेक आठवड्यांपर्यंतचे ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’चे शो बुक आहेत. तूर्तास ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर धूम केली आहे. लोक चित्रपटाची तोंडभरून प्रशंसा करत आहेत.  




भारतातही चित्रपटाबद्दल उत्साह पाहायला मिळतोय. भारताचे ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांनी या चित्रपटाला 5 स्टार दिलेत. हा चित्रपट एक परफेक्ट एंटरटेनर आहे. यात फन, इमोशन, अ‍ॅक्शन, क्लेवर स्क्रीनप्ले असे सगळे आहे, असे त्यांनी लिहिले आहे.




हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झालेत. मी कधीही सुपरहिरो चित्रपट पाहून रडलो नाही. पण ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ पाहताना माझ्या भावना मी रोखू शकलो नाही, असे एका युजरने लिहिले. ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’सारखा चित्रपट भविष्यात पुन्हा पाहायला मिळेल का, हे मला ठाऊक नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.



‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ प्रत्येक बाबतीत मास्टरपीस आहे. प्रत्येक सीन भावूक करणारा आहे, असे अन्य एका युजरने लिहिले. एकंदर काय तर ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ प्रेक्षकांच्या कसोटीवर एकदम खरा उतरला आहे. आता फक्त हा चित्रपट किती आणि कोणते विक्रम घडवतो, हेच पाहायचे आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’च्या चाहत्यांच्या काही निवडक प्रतिक्रिया खास तुमच्यासाठी...













 

Web Title: avengers endgame release india social media reaction get epic response