एलियाना अडकली लग्नबंधनात, एकही पाहुणा उपस्थित नसताना झाला 100 कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:08 IST2021-05-27T18:08:03+5:302021-05-27T18:08:22+5:30
एलियानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

एलियाना अडकली लग्नबंधनात, एकही पाहुणा उपस्थित नसताना झाला 100 कोटींचा खर्च
लग्नसमारंभ म्हटले की खर्च हा आला... त्यामुळे लग्नात लोकांना आमंत्रण देताना अगदी जवळच्या लोकांना बोलावण्याचा लोक प्रयत्न करत असतात. कारण जितके लोक कमी जितका खर्च कमी असेच मानलेे जाते. पण लग्नाला एकही पाहुणा आलेला नसताना लग्नाचा खर्च 100 कोटी झाला असे कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का... पण हे खरे आहे.
लास्ट ख्रिसमस, साईड टू साईड, बँग बँग यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे एलियाना ग्रँडला चांगलीच लोकप्रियता मिळाली. जगातील सगळ्यात प्रसिद्ध गायिकांमध्ये तिची गणना केली जाते. तिने नुकतेच डेल्टन गोमेजसोबत लग्न केले. तो अमेरिकेतील प्रसिद्ध व्यवसायिक आहे. त्या दोघांच्या अफेअरची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. एक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
एलियानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. तिचे चाहते या फोटोद्वारे तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. एलियानाला अतिशय थाटामाटात लग्न करायचे होते. पण कोरोनामुळे तिला तिच्या जवळच्या लोकांना देखील लग्नाला बोलवता आले नाही. तिची मित्रमंडळी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून या लग्नाला उपस्थित होती.
विशेष म्हणजे एलियानाच्या लग्नाला एकही पाहुणा उपस्थित नव्हता. तरी देखील या लग्नासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. एलियाना आणि डेल्टनने मिळून नुकतंच एक घर खरेदी केले आहे. जवळपास सहा एकरमध्ये पसरलेल्या या घराची किंमत 80 कोटींच्या आसपास आहे. शिवाय त्यामधील फर्निचर आणि इतर सजावटीसाठी त्यांना 20 कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागला. लग्न करण्यासाठीच त्यांनी हे घर घेतले असल्याने त्यांच्या लग्नाला इतका खर्च झाला.