अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 09:52 IST2024-03-02T09:47:27+5:302024-03-02T09:52:58+5:30

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स, गायिकेच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं

anant ambani radhika merchant pre wedding rihanna performed said i love india wins netizens heart | अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली...

अंबानींच्या कार्यक्रमात रिहानाचीच चर्चा! प्री वेडिंगमध्ये परफॉर्मन्स ते पापाराझींच्या गळ्यात हात टाकून फोटो; सिंगर म्हणाली...

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. अंबानींचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या गुजरातमधील जमनागर येथे त्यांचं प्री वेडिंग फंक्शन सुरू आहे. अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. १ ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यासाठी पॉप सिंगर रिहानालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. 

रिहानाने अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, त्याबरोबरच तिच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये गाणं गायल्यानंतर रिहाना पुन्हा मायदेशी परतली. यावेळी एअरपोर्टवरील तिच्या कृतीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. रिहानाने एअरपोर्टवर पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. त्याबरोबरच तिने फॅन्सबरोबर फोटोही काढले. "I Love India" म्हणत रिहानाने भारताबद्दल तिच्या भावनाही व्यक्त केल्या. 

हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाचे व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. "बॉलिवूड  सेलिब्रिटींनी एक सेल्फीही घेऊन दिला नसता", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "तिच्याकडे भारतीय सेलिब्रिटींसारखा अॅटिट्युड नाही", असंही म्हटलं आहे. "याला म्हणतात मॅनर्स", अशी कमेंटही केली आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी रिहानाने तब्बल ४१ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.

अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच क्रिकेटर्स आणि उद्योग विश्वातील मंडळींनी हजेरी लावली होती. प्री वेडिंगनंतर जुलै महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: anant ambani radhika merchant pre wedding rihanna performed said i love india wins netizens heart