पॉर्न स्टार सोफिया लियोनीची आत्महत्या, वयाच्या २६ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 10:13 IST2024-03-10T10:13:13+5:302024-03-10T10:13:59+5:30

गेल्या काही दिवसांपासून अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Adult film star Sophia Leone commits suicide at the age of 26 step father confirms | पॉर्न स्टार सोफिया लियोनीची आत्महत्या, वयाच्या २६ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

पॉर्न स्टार सोफिया लियोनीची आत्महत्या, वयाच्या २६ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

गेल्या काही दिवसांपासून अडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात पॉर्न स्टार थैना फील्ड्स, तर फेब्रुवारीत काग्नी लीनने जीवनयात्रा संपवली. तर आता प्रसिद्ध पॉर्न स्टार सोफिया लियोनीनेही आत्महत्या केली आहे. वयाच्या केवळ २६ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. राहत्या घरीच तिचा मृतदेह आढळून आला.

सोफिया लियोनीचे सावत्र वडील माइक रोमेरो यांनीही स्टेटमेंट जारी करत मुलीच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी सांगितले की, 'तिची आई आणि कुटुंब आम्ही सगळेच धक्क्यात आहोत. अचानक तिने उचललेल्या या पावलामुळे तिचं कुटुंब, मित्रपरिवार अक्षरश: कोलमडून गेला आहे.'

सोफिया लियोनीच्या वडिलांच्या सांगण्यानुसार, १ मार्च रोजी ती आपल्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तिला फिरण्याची आवड होती आणि ती आजूबाजूंच्यांना नेहमीच खूश ठेवायची. सोफियाच्या निधनानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. कमी वयात महिलांच्या अकस्मात मृत्यूवर चिंता उपस्थित करण्यात येत आहे.  अडल्ट स्टारने आत्महत्या केल्याची गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. 

Web Title: Adult film star Sophia Leone commits suicide at the age of 26 step father confirms