धक्कादायक! भीषण बाईक अपघातात २७ वर्षीय अभिनेत्याचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 11:00 AM2024-03-31T11:00:10+5:302024-03-31T11:00:33+5:30

Chance Perdomo Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या २७ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसलाय

actor chance perdomo bike accident death at the age of 27 | धक्कादायक! भीषण बाईक अपघातात २७ वर्षीय अभिनेत्याचं निधन

धक्कादायक! भीषण बाईक अपघातात २७ वर्षीय अभिनेत्याचं निधन

काही दिवसांपुर्वी भोजपुरी गायकाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली होती.  आता नुकतंच मनोरंजन जगतातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता चांस पेरडोमोचं दुःखद निधन झालंय. चांस अवघ्या २७ वर्षांचा होता. बाईकच्या झालेल्या भीषण अपघातात चांस जागीच गतप्राण झाला. त्याच्या निधनाने चाहत्यांना चांगलाच धक्का बसलाय.

‘जेन वी मूमिन वैली’ आणि ‘आफ्टर वी फेल’ अशा सिनेमांमधून चांसने कमी कालावधीत लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळख मिळवली. चांसच्या प्रवक्त्याने त्याच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी करत सांगितले की, "जड अंतःकरणाने आम्ही चांस पेरडोमोच्या निधनाची बातमी देत आहोत. दुचाकी अपघातात चांसचं अकाली निधन झालं आहे. या घटनेत अन्य कोणाचाही सहभाग नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चांसची कलेची आवड आणि जीवनावरील प्रेम सर्वांना माहीत होते."

चांसचा हा अपघात कुठे आणि कधी झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना मात्र जबर धक्का बसला आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात त्यांनी लिहीलंंय की, "चांस पेरडोमोच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंब दु:खी झाले आहे. Amazon MGM स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन या कठीण काळात चांसच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आहे."

Web Title: actor chance perdomo bike accident death at the age of 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.