दरमहा १.६३ कोटी अन् ५ मागण्या, किम कार्दशियनला घटस्फोट देणं कान्ये वेस्टला पडलं चांगलंच महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:54 IST2022-12-01T14:54:17+5:302022-12-01T14:54:48+5:30
Kanye West And Kim Kardashian: हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट आणि अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार किम कार्दशियन यांचा घटस्फोट घेणार आहेत.

दरमहा १.६३ कोटी अन् ५ मागण्या, किम कार्दशियनला घटस्फोट देणं कान्ये वेस्टला पडलं चांगलंच महागात
हॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) आणि अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार किम कार्दशियन (Kim Kardashian) यांचा घटस्फोट घेणार आहेत. मागील वर्षी ते दोघे वेगळे झाले होते. तथापि, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. किम पीट डेव्हिडसनला डेट करत होती. पण या वर्षी ऑगस्टमध्ये ते दोघे वेगळे झाले. कान्ये आणि किम यांच्या घटस्फोटाच्या अपीलवर कोर्टात सुनावणी झाली. १४ डिसेंबरपासून खटला सुरू होणार होता. या सुनावणीत दोघांनाही मुलांचा ताबा मिळाला आहे. यासह कान्येला आता दरमहा किमला १.६३ कोटी रुपये द्यावे लागतील. यासोबतच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही तो किमसोबत उचलणार आहे.
सेटलमेंटचा एक भाग म्हणून, कान्ये वेस्ट किम कार्दशियनला मुलांसाठी २ लाख डॉलर म्हणजे १.६३ कोटी रुपये दरमहा देणार आहे. असे aceshowbiz.com. न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. माजी जोडप्याला त्यांच्या ४ मुलांचा संयुक्त ताबा मिळेल. त्याच्या चार मुलांच्या राहण्याच्या खर्चाव्यतिरिक्त, कान्ये त्यांच्या शैक्षणिक खर्चाच्या ५० टक्के जबाबदार असेल.
किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट या दोघांकडे चारही मुलांचा संयुक्त ताबा असेल. दोघांपैकी कोणीही एकमेकांचा खर्च उचलणार नाहीत. संगनमताने मान्य केलेल्या गोष्टींमध्ये, किम आणि कान्ये मुलांची खाजगी सुरक्षा, महाविद्यालयासह खासगी शिक्षणाचा खर्च समान वाटून घेणार आहेत.
किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट हे दोघेही संयुक्तपणे आपापल्या कर्जाची परतफेड करतील. किम आणि कान्ये वेस्ट यांनी विवाहपूर्व एक करार केला होता आणि त्यामुळे त्यांनी त्यांची बहुतेक मालमत्ता वेगळी ठेवली होती. घटस्फोटादरम्यान किमचे तिच्या मुलांना प्राधान्य होते. म्हणूनच तिने स्वतःपेक्षा मुलांच्या भविष्याला अधिक महत्त्व दिले. त्यांच्यासाठी जे फायद्याचं असेल त्या अटी तिने मान्य केल्या. कान्ये वेस्ट आता मुलांच्या शिक्षणाचा निम्मा खर्च उचलेल आणि ट्यूशन फीदेखील भरेल.
किम कार्दशियनचा हा तिसरा घटस्फोट असून तिने २०१४ मध्ये कान्ये वेस्टशी लग्न केले. हे लग्न इटलीत पार पडले. या लग्नापासून किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट चार मुलांचे पालक झाले. त्यांना दोन मुली नॉर्श आणि शिकागो आणि दोन मुलं सॅम आणि सेंट.