हर्षवर्धनला प्रेमाचा 'कैफ'... सोनमच्या लग्नानंतर 'हिच्या'सोबत करतोय डेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 16:54 IST2018-06-04T16:53:50+5:302018-06-04T16:54:40+5:30

सोनम कपूरच्या लग्नानंतर आता अनिल कपूर यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई बघायला मिळण्याची शक्यता आहे.

Harshvardhan Kapoor and Isabelle Kaif spotted together, rumors of affair | हर्षवर्धनला प्रेमाचा 'कैफ'... सोनमच्या लग्नानंतर 'हिच्या'सोबत करतोय डेटिंग

हर्षवर्धनला प्रेमाचा 'कैफ'... सोनमच्या लग्नानंतर 'हिच्या'सोबत करतोय डेटिंग

मुंबई : सोनम कपूरच्या लग्नानंतर आता अनिल कपूर यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई बघायला मिळण्याची शक्यता आहे. अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन सध्या कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सोबत फिरताना दिसत आहे. इतकेच काय तर बॉलिवूडमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. 

नुकताच हर्षवर्धन कपूरची मुख्य भूमिका असलेला 'भावेश जोशी-सुपरहिरो' हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार खास काही कमाल करु शकत नाहीये. याआधी त्याचा आलेला सिनेमा मिर्जिया सुध्दा असाच आपटला होता. त्यामुळे त्याच्या करिअरला पुढे सुरु ठेवण्यासाठी असलेला हिट सिनेमाचा शिक्का त्याच्यावर बसला नाहीये. 

दरम्यान, हर्षवर्धन हा सिनेमातील कामामुळे नाहीतर कतरिना कैफी बहीण इसाबेलसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे.

नुकतेच दोघेही भावेश जोशी-सुपरहिरो सिनेमाच्या प्रायव्हेट स्क्रीनिंगला एकत्र दिसले होते. स्क्रीनिंगनंतर एकाच कारमधून दोघे परत गेले होते. या दोघांच्या अफेअरबाबत आमच्याकडे अधिकृत माहिती तर नाहीये, पण बॉलिवूडमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा मात्र रंगलीये.

Web Title: Harshvardhan Kapoor and Isabelle Kaif spotted together, rumors of affair