'फुल टाइट'... कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट; सोनी लिव्हची नवी वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 19:27 IST2018-07-23T19:26:19+5:302018-07-23T19:27:43+5:30

अशाच एका घरातील 'फुल टू धम्माल' गोष्ट म्हणजे 'फुल टाइट' ही 'सोनी लिव्ह'ची नवी-कोरी वेबसीरिज.

'FULL TIGHT' A New Comedy Family Drama Marathi Webseries by sony liv | 'फुल टाइट'... कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट; सोनी लिव्हची नवी वेबसीरिज

'फुल टाइट'... कमाल कुटुंबाची धमाल गोष्ट; सोनी लिव्हची नवी वेबसीरिज

मुंबईः 'मेन विल बी मेन' हा इंग्रजी वाक्प्रचार आपल्याला चांगलाच परिचित आहे. बायकोला बिचकून राहणारा, पण तिच्यापासून लपून-छपून बऱ्याच गोष्टी करणारा नवरा आणि गोड-गोड बोलून आईला गुंडाळून ठेवत घराबाहेर चंगळ करणारा मुलगा अनेक घरांमध्ये असतो. अशाच एका घरातील 'फुल टू धम्माल' गोष्ट म्हणजे 'फुल टाइट' ही 'सोनी लिव्ह'ची नवी-कोरी वेबसीरिज. 'लोकमत डॉट कॉम' या मालिकेचा मीडिया पार्टनर आहे. 

अजित आणि माधुरी यांचा मुलगा आदित्य. नव्या पिढीचा प्रतिनिधी. आयुष्य बिनधास्त जगणारा तरुण. समीरा या तरुणीवर त्याचं प्रेम आहे आणि त्याच्या आई-बाबांनाही ती सून म्हणून मान्य आहे. सगळ्याच आई-बाबांप्रमाणे अजित-माधुरी यांनाही आपलं बाळ निरागस वाटत असतं. मुलालाही आपले आई-बाबा साधे-भोळे वाटत असतात. पण, अचानक बाळाचे प्रताप बाबांना कळतात आणि बाबांचे प्रताप बाळाला... त्यानंतर जो काही गोंधळ उडतो, त्याची गोष्ट म्हणजे 'फुल टाइट'. 

या वेबसीरिजमध्ये प्रसिद्ध अभिनेते यतीन कार्येकर, स्नेहा रायकर, सुमुखी पेंडसे, वनश्री जोशी, अक्षय केळकर, सायली साळुंखे यांच्या भूमिका आहेत. विजय बारसे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून श्रीप्रसाद पवार दिग्दर्शक आहेत. 

'फुल टाइट'चा पहिला भाग... 

Web Title: 'FULL TIGHT' A New Comedy Family Drama Marathi Webseries by sony liv