सानिया मिर्झापासून ते एड शीरनपर्यंत... 'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:40 PM2024-05-08T12:40:53+5:302024-05-08T12:42:39+5:30

कपिल शर्मा हे नाव छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी असतं.

From Sania Mirza to Ed Sheeran... this stars to participate in second season of 'The Great Indian Kapil Show'! | सानिया मिर्झापासून ते एड शीरनपर्यंत... 'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार!

सानिया मिर्झापासून ते एड शीरनपर्यंत... 'हे' स्टार्स 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार!

कपिल शर्मा हे नाव छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी असतं. लाखो प्रेक्षकांचं मनोरंजन करून झाल्यानंतर नव्या उत्साहात नव्या शीर्षकासह कपिल शर्मोने ओटीटीवर पदार्पण केलंय. ३० मार्च रोजी कपिलच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची सुरुवात झाली. या शोचे आतापर्यंत 7 एपिसोड्स स्ट्रीम झाले आहेत. आता हा पहिला सीझन संपणार असून दुसरा सीझन लवकरच येणार आहे. तर दुसऱ्या सीझनमध्ये कोण येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या पहिल्या सीझनमध्ये आत्तापर्यंत आमिर खान, रोहित शर्मा, रणबीर कपूर, नीतू कपूर, परिणीती चोप्रा, इम्तियाज अली, दिलजीत दोसांझ  यांच्यासह अनेक स्टार्स सहभागी झाले. सर्व एपिसोडला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. शोचा पहिला सीझन संपणार, या बातमीने चाहते खूपच निराश झाले होते. पण शोच्या दुसऱ्या सीझनच्या घोषणेनं चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. रिपोर्टनुसार, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड, हॉलीवूडपासून ते स्पोर्ट्सपर्यंतचे स्टार्स येणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हॉलिवूड गायक एड शीरन, बॅडमिंटनपटू सानिया मिर्झा आणि बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरसह अनेक दिग्गज स्टार्स शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. दरम्यान, या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मा, सुनिल ग्रोवर, राजीव ठाकुर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक असे विनोदवीर प्रेक्षक आणि कलाकारांच मनोरंजन करताना दिसतायत. तर अर्चना पुरण सिंगदेखील या शोमध्ये आहेत.
 

Web Title: From Sania Mirza to Ed Sheeran... this stars to participate in second season of 'The Great Indian Kapil Show'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.