Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 11:16 IST2025-09-01T11:13:50+5:302025-09-01T11:16:23+5:30
Jee Le Zaraa Movie Update: एका पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला 'जी ले जरा' सिनेमाविषयी अपडेट विचारण्यात आलं.

Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."
Jee Le Zaraa Movie Update: फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) 'जी ले जरा' (Jee Le Zara) हा बहुप्रतिक्षित सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. काही वर्षांपूर्वी फरहानने या सिनेमाची घोषणा केली होती. आलिया भट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा अशी स्टारकास्ट यामध्ये असणार होती. या तीन आघाडीच्या अभिनेत्री एकाच सिनेमात येणार म्हटल्यावर प्रेक्षक आतुर झाले होते. मात्र नंतर सिनेमाबद्दल पुढे काहीच अपडेट आलं नाही. आता नुकतंच फरहानने सिनेमावर भाष्य केलं आहे.
एका पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला 'जी ले जरा' सिनेमाविषयी अपडेट विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, "जी ले जरा सिनेमा बंद झालाय असं मी म्हणणार नाही. एवढंच म्हणेन की हा सिनेमा सध्या मागे राहिला आहे. हा सिनेमा नक्की बनेल. कधी ते सांगू शकत नाही. सिनेमाची स्क्रिप्ट अप्रतिम आहे. सिनेमाचं बरंचसं काम झालं आहे. मी सगळे लोकेशन फायनल केले आहेत. सिनेमाचं संगीतही रेकॉर्ड झालं आहे. आता सिनेमा सुरु पुन्हा सुरु करण्यासाठी मी योग्य वेळेची वाट बघत आहे. आता मी सिनेमाच्या कास्टवर बोलू शकत नाही. कारण आता सिनेमात कोण येईल पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. पण सिनेमा नक्कीच बनेल यात शंका नाही."
'जी ले जरा' सिनेमा हा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'सारखाच असणार आहे. फक्त ही तीन मित्रांची नाही तर तीन मैत्रिणींची रोड ट्रीप असणार आहे. हा सिनेमा कधी बनणार यासाठी आता चाहत्यांना आणखी वाट बघावी लागणार आहे. दरम्यान फरहान अख्तर आगामी '१२० बहादुर' सिनेमात दिसणार आहे. चित्रपट १९६२ मधील रेझांग ला येथील खऱ्या युद्धावर आधारित आहे, जिथे फक्त १२० भारतीय जवानांनी हजारो शत्रूंचा मुकाबला करत इतिहास रचला. फरहान अख्तरचा गंभीर, समंजस आणि हृदयस्पर्शी अभिनय मेजर शैतान सिंह यांच्या रूपात विशेष लक्षवेधी ठरत आहे.