मुर्खपणाचा कळस, Shilpa Sheety ने डॉगीसोबत दिल्या पोज, उडवली जातेय खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 11:02 IST2021-10-29T10:58:23+5:302021-10-29T11:02:25+5:30
Shilpa Shetty ने पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. त्याला कारणीभूत ठरलेत तिचे हे खास फोटो.

मुर्खपणाचा कळस, Shilpa Sheety ने डॉगीसोबत दिल्या पोज, उडवली जातेय खिल्ली
सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे शिल्पा शेट्टी चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते. तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. पुन्हा एकदा शिल्पाने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. त्याला कारणीभूत ठरलाय तिचा हा खास व्हिडीओ.एरव्ही आपण स्टायलिश ड्रेसिंगमध्ये तिचे व्हिडीओ, फोटो पाहत असतो. कधी सेटवरचे तर कधी कुटुंबासोबत मजा मस्ती करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता तर आणखी हटके फोटो तिचे समोर आले आहेत.
आता थेट डॉगीसोबत फोटो काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. डॉगी सारखेच पोजही तिने फोटोसाठी दिले आहेत. हे फोटो पाहून चाहते मात्र हसून हसून लोटपोट होत आहेत. काहीजण तर तिचे असे फोटो व्हिडीओ पाहून आश्चर्यचकीतही झाले आहेत.
आजपर्यंत असे फोटो तुम्ही कधीच कोणत्याच सेलिब्रेटीचे पाहिले नसतील. मात्र आता फोटोसाठी वाट्टेल ते करायला सेलिब्रेटी अजिबात विचार करत नाहीत हेच तिच्या या व्हिडीओवरु स्पष्ट झाले आहे. मुळात हे फोटो पाहून चाहत्यांचा तिच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिल्पाचाहा व्हिडीओ पाहून अनेकांनी राज कुंद्रावरही निशाणा साधला आहे. राज कुंद्रा नुकताच जेलची हवा खावून आलाय आणि शिल्पा मात्र फोटो काढण्यात बिझी आहे. निव्वळ मुर्खपणाचा कळस आहे हा अशा प्रतिक्रीया तिच्या या फोटोंवर उमटत असल्यामुळे शिल्पाचीही मजा मस्ती केवळ मुर्खपणाचा कळसच ठरत असल्याचे पाहायला मिळतं. शिल्पाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता यापुढे शिल्पा चर्चेत राहण्यासाठी अजून काय काय करणार विचार न केलेलाच बरा.